रान डुक्कराने दिली एसटीला धडक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 डिसेंबर 2017

सावंतवाडी - जंगलातून रस्त्यावर धावत येणार्‍या रान डुक्कराने राज्यमार्गावर धावणार्‍या एसटी बसला 'डायरेक्ट' धडक दिली. विशेष म्हणजे यात एसटीच्या पुढच्या भागाचे सुमारे दहा हजाराचे नुकसान झाले आहे. ही घटना आज सकाळी साडेअकराच्या सुमारास कारिवडे भोगटेनगर येथे आंबोली सावंतवाडी रस्त्यावर घडली. 

डुक्कराने त्याठिकाणावरुन पळ काढला. मात्र एसटी काहीची काच फुटल्याने ती बराच वेळ थांबवावी लागली तर प्रवाशांना अन्य गाडीतून स्थलांतरीत करण्यात आले. याबाबत अधिक माहिती अशी की, कोल्हापूर ते सावंतवाडी असा प्रवास करणार्‍या सावंतवाडी आगाराची बस आज सकाळी साडेअकराच्या सुमारास प्रवासी घेवून सावंतवाडीच्या दिशेने येत होती. यावेळी चालक नासिर जमादार हे गाडी चालवित होते. 

दरम्यान कारिवडे भोगटेनगर परिसरात गाडी आली असता बाजूच्या जंगलातून धावत रस्त्यावर येणार्‍या जंगली डुक्कराने थेट एसटीवर उडी घेतली. यात पुढच्या भागाला तो आदळल्याने एसटीची काच फुटलीच तर समोरचा पत्र्याचा भागही चेपला. अचानक झालेला प्रकार लक्षात घेता नेमके काय झाले हे चालक व प्रवाशांना कळलेच नाही. त्यांनी तत्काळ त्याठिकाणी गाडी थांबविली. दरम्यान रस्ता पार करुन बाजूच्या शेतात जाणारा भला मोठा डुक्कर सर्व प्रवाशांना दिसला. त्यामुळे एसटी थांबवून अनेकांनी त्याला शोधण्यासाठी मोठी गर्दी केली. गाडीचे नुकसान झाल्यामुळे दुसरी गाडी बोलावून प्रवाशांना बसस्थानकात नेण्यात आले. या अपघातात कोणीही जखमी झालेले नाही. परंतु गाडीचे दहा हजाराचे नुकसान झाले आहे, असे आगार व्यवस्थापक अजय पाटील यांनी सांगितले. 

Web Title: Marathi News Kokan News ST Bus Accident Wild Animal