आदिवासीवाडीतील युवकांना दाखविल्या प्रशासनात दाखल होण्याचा वाटा

Pali
Pali

पाली (रायगड) : सुधागड तालुक्यातील हातोन्ड, चंदरगाव, महागाव हा डोंगरी आणि आदिवासी बहुल तसेच आर्थिक दृष्ट्या अत्यंत दुर्बल लोकवस्ती असलेला भाग आहे. येथील ग्रामपंचायत हद्दीतील सर्व खेडेगाव आणि आदिवासीपाड्यातील 10वी, 12वी आणि पदवीपर्यंत शिक्षण घेतलेले किंवा शिकत असलेल्या मुला-मुलींना विविध नोकऱ्यांच्या संधी मिळाव्यात व प्रशासनात दाखल होण्याच्या वाट दाखविण्याकरिता नुकतेच चंदरगाव येथे मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते. 

या विभागांतील हातोंड गावाचे मूळ रहिवाशी असलेले राजेंद्र वाघमारे, पोलिस हवालदार, बिनतारी संदेश विभाग मुंबई यांनी यासाठी पुढाकार घेतला होता. यावेळी सर्व प्रथम "भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे शपथपूर्वक वाचन करण्यात आले".

प्रत्यक्षात भारत-पाकिस्तान 1971 च्या लढाईत लढलेले सैनिक प्रकाश महाडिक यांनी युध्दातील आठवणी सांगितल्या. सैनिक का व्हावे?, आणि कसे होता येते?, सैन्याची निवड पद्धती कशी असते?, आपणास काय करावयास हवे?, आपल्यातील नकारात्मक उर्जेचे सकारात्मक उर्जेत कसे रुपांत करावे?, यशाला गवसणी कशी घालावी? यासाठी उपस्थितांना उत्तमरित्या प्रबोधित केले. तुम्ही सैन्यात आणि पोलिस दलात किंवा अन्य सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये मोठे अधिकारी बनण्याची मनात गाठ बांधा असे युवकांना आवाहन केले.

राजेंद्र वाघमारे यांनी सांगितले की, येथील मुले ही मोठे अधिकारी बनून आपल्या कर्तूत्वाचा ठसा नक्की उमठवतील, "मला साहेब व्हायचंय" ही मनीषा मनाशी बाळगा. शारीरिक चाचणीची तयारी कशी करावी?, काय काळजी घ्यावी?, लेखी परीक्षेची तयारी कशी करावी?, आपण कुठे कमी पडतो? स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी? यांचे सविस्तर मार्गदर्शन वाघमारे यांनी केले. डोंगरी भागात यशस्वीपणे प्रशिक्षण केंद्र देखील सुरू करण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.

वसंत गोगले, अध्यक्ष-तंटामुक्ती समिती चंदरगाव यावेळी अगदी भावनाविवश होऊन म्हणाले की, गाव खेड्यात कोण लक्ष देतो. जो तो शहरात जातो आणि आपल्या सुखात आनंदी असतो. पण राजेंद्र वाघमारे साहेब जे काही आज करीत आहेत. ते म्हणजे आपल्या सोबत इतरांना देखील मोठे करणे आहे. मी असा कार्यक्रम प्रथमच पाहिला, आणि विश्वास वाटला की नक्कीच आमची मुले यशस्वी होतील. या पुढे मी प्रत्येक गावात जाऊन सर्वांना या कार्यशाळेविषयी माहिती देईल. 

यावेळी आंबोरे सर, अधीक्षक -आदिवासी आश्रमशाळा पडसरे, आणि त्यांचे सहकारी शिक्षक रायकर सर, रघूनाथ वाघमारे-सेवानीवृत्त मुख्याध्यापक चंदरगाव शाळा, राहुल वाघमारे, अर्चना वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते. या शिबिरात दुर्गम भागातील सुमारे 35 ते 40 मुलांनी सहभाग घेतला. रा. जि. प. शाळा - हातोंडचे शिक्षक रासकर सर यांनी या कार्यक्रमाची विशेष जाहिरात करून प्रत्येक गरजू घटकापर्यंत माहिती पोहचवीण्या करीता विशेष प्रयत्न केले. 

आपल्या विश्वासू मित्रांना वाट्सपच्या माध्यमातून आव्हान कले आहे की, "आदिवासी आणि गरीब मुलांना द्या मदतीचा हात, हवी आपली साथ" यासाठी अनेकांची मदत मिळत आहे. मी मूळचा याच मातीतील असल्याने येथील गरीब, होतकरु मुलांना सक्षम करण्यासाठी प्रयत्न करणे माझे प्रथम कर्तव्य आहे. आम्ही जसे प्रगतिकडे जाऊ लागलो तसेच या भागांतील सर्वांची प्रगती व्हावी ही अपेक्षा आहे, असे मत पोलिस हवालदार राजेंद्र वाघमारे यांनी व्यक्त केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com