लोकसहभागातून उभारली वीस हाजारांची रक्कम

अमित गवळे
मंगळवार, 30 जानेवारी 2018

पाली : रायगड जिल्हा परिषद शाळा धोंडसे व सोमजाई ग्रामस्थ मित्र मंडळ धोंडसे यांच्या संयुक्त विद्यमाने सलग तिसरे स्नेहसंमेलन नुकतेच उत्साहात संपन्न झाले. यावेळी मान्यवरांचे व गावकऱ्यांचे विद्यार्थ्यांच्या हस्ते एक रोपटे देऊन स्वागत करुन पर्यावरण जनजागृतीचा संदेश देण्यात आला. 

पाली : रायगड जिल्हा परिषद शाळा धोंडसे व सोमजाई ग्रामस्थ मित्र मंडळ धोंडसे यांच्या संयुक्त विद्यमाने सलग तिसरे स्नेहसंमेलन नुकतेच उत्साहात संपन्न झाले. यावेळी मान्यवरांचे व गावकऱ्यांचे विद्यार्थ्यांच्या हस्ते एक रोपटे देऊन स्वागत करुन पर्यावरण जनजागृतीचा संदेश देण्यात आला. 

सुधागड तालुक्याच्या सभापती साक्षी दिघे यांच्या विशेष उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. शाळेचे मुख्याध्यापक दिलीप गावित यांनी आपल्या प्रस्तावनेत विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण व शाळेच्या विकासासाठी लोकसहभाग मिळावा या हेतूने कार्यक्रमाचे नियोजन केल्याचे सांगितले. यावेळी लहानग्यांसह मोठ्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट नृत्य करून सर्व प्रेक्षकांची मने जिंकली. विदयार्थ्यांच्या कलागुणांना उदंड प्रतिसाद मिळूण शाळेसाठी बक्षिसरुपी वीस हजार रुपयांपर्यंतची रक्कम मिळाली. तसेच संतोष जाधव यांनी शाळेस उत्कृष्ट दर्जाचे कपाट भेट दिले. शाळेच्या सहशिक्षिका सीमा सिरसट यांनी मुलांचे नृत्य बसवण्यासाठी विशेष मेहनत घेतली. 

सहशिक्षक कुणाल पवार यांनी आपल्या खास शैलीत प्रभावी सूत्रसंचालन केले. उभी राहिलेली ही रक्कम शाळेच्या व विदयार्थ्यांच्या विकसासाठी वापरण्यात येणार असल्याचे मुख्याध्यापक दिलीप गावित यांनी सांगितले. या कार्यक्रमासाठी ह.भ.प किरण कुंभार, स्वप्निल शेळके-सरपंच, प्रकाश तायडे -केंद्रप्रमुख, सुजित बरस्कर, कविता कुलकर्णी, मोरेश्वर कांबळे, प्रीती खंडागळे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा व आजी माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते. 

आज विद्यार्थ्यांनी रोप देऊन आगळी वेगळी भेट दिली. एवढे छोटेसे गाव असूनही इतक्या छान पद्धतीने आयोजन करून विद्यार्थ्यांनी खूपच छान नृत्य सादर केले. शिक्षकांनी चांगली मेहनत घेतली आहे. त्यांना पुढील कार्यासाठी माझ्याकडून शुभेच्छा, पंचायत समिती सुधागडच्या सभापती साक्षी दिघे यांनी व्यक्त केले.  

 

Web Title: Marathi news kokan news twenty thousand raised by peoples participation