तटकरेंच्या मध्यस्थीने शेतकऱ्यांचे आमरण उपोषण स्थगित 

अमित गवळे 
शनिवार, 23 डिसेंबर 2017

पाली (जि. रायगड) : वाकण-पाली-खोपोली मार्ग रुंदीकरण बाधित शेतकऱ्यांनी सुरू केलेले आमरण उपोषण आमदार सुनील तटकरे यांच्या मध्यस्थीने काल (शुक्रवार) स्थगित करण्यात आले. हे शेतकरी गेल्या मंगळवारपासून (ता. 19) उपोषणाला बसले होते. 

पाली (जि. रायगड) : वाकण-पाली-खोपोली मार्ग रुंदीकरण बाधित शेतकऱ्यांनी सुरू केलेले आमरण उपोषण आमदार सुनील तटकरे यांच्या मध्यस्थीने काल (शुक्रवार) स्थगित करण्यात आले. हे शेतकरी गेल्या मंगळवारपासून (ता. 19) उपोषणाला बसले होते. 

'बाधितांना न्याय मिळेपर्यंत शांत बसणार नाही. विरोधी पक्षाच्या भूमिकेतून सरकारला योग्य ती नुकसान भरपाई देण्यासाठी कटिबद्ध आहे', अशी ग्वाही तटकरे यांनी दिली. 'हा प्रश्‍न सोडविण्याची जबाबदारी मी माझ्या खांद्यावर घेतली आहे. तुम्ही निश्‍चिंत राहा. वेळप्रसंगी हा प्रश्‍न सोडविण्यासाठी तुमच्याबरोबर मी स्वत: उपोषणाला बसेन' असेही तटकरे यांनी सांगितले. यानंतर शेतकऱ्यांनी उपोषण मागे घेतले. 

'देशाचे पंतप्रधान म्हणतात की शरद पवार यांचे बोट धरून आम्ही शिकलो. पवार यांचे बोट किती मजबूत आहे, हे यावरून स्पष्ट होते. रस्ता रुंदीकरणादरम्यान आजवर शेतकऱ्यांच्या पिकांची झालेली नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठीही आम्ही प्रयत्नशील आहोत' असे तटकरे म्हणाले. सुधागड तालुका शेतकरी समन्वय संघर्ष समितीच्या वतीने अध्यक्ष प्रमोद मोरे यांनी तटकरे यांने आभार मानले. 

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंत ओसवाल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पेण, सुधागड मतदारसंघाच्या अध्यक्षा गीता पालरेचा, सभापती साक्षी दिघे, तहसीलदार बी. एन. निंबाळकर, सुधागड तालुका शेतकरी समन्वय संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष विनोद भोईर, उपाध्यक्ष चंद्रकांत शिंदे, सचिव गिरिष काटकर, राजेंद्र खरिवले, रमेश साळुंके, अभिजीत चांदोरकर, सुशिल शिंदे, विजय जाधव शिरिष सकपाळ, सचिन तेलंगे, रविंद्र जाधव, मिलिंद खंकाळ, संतोष जगताप, संजय काटकर, नाझीर पठाण, देउ गदमळे, मारुती काटकर, संतोष जोरकर, अशोक शेडगे आदिंसह शेतकरी उपस्थित होते. 

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विधानपरिषदेत बारा नंबरची लक्षवेधी मांडली आहे. त्याद्वारे शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईची मागणी उचलून धरली आहे. 2 ते 3 जानेवारी 2018 यादरम्यान पाली खोपोली मार्ग रुंदीकरणबाधित शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बैठक लावली जाणार आहे. वेळ प्रसंगी शरद पवार, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, अजितदादा पवार हेदेखील या प्रश्नात लक्ष देतील व शेतकऱ्यांना योग्य न्याय मिळवून दिला जाईल. 25 डिसेंबर रोजी शरद पवार पालीत येत असून बाधित शेतकऱ्यांची भेट घालून याबाबत निवेदन दिले जाईल. 
- सुनील तटकरे, आमदार 

Web Title: marathi news marathi websites Raigad News Sunil Tatkare