सुधागड तालुक्यातील आरोग्य शिबीरात अडिचशेहून अधिक रुग्णांची तपासणी

अमित गवळे 
शुक्रवार, 19 जानेवारी 2018

पाली (रायगड) : आमचा ध्यास, ग्रामीण विकास रोटरी क्लबचा सहकारी हात उरणार नाही गावात रोगांची साथ… हे ब्रिदवाक्य घेऊन सुधागड तालुक्यातील भार्जे गावात नुकतेच विनामुल्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रोटरी क्लब ऑफ ठाणे आणि ग्रीनसीटी व सुधागड प्रतिष्ठान ठाणे व श्री काळभैरव सहकारी सेवाभावी संस्था भार्जे यांचे संयुक्त विद्यमाने हे शिबिरी आयोजित केले होते.

या शिबीरात २५३ रुग्णांची तपासणी करण्यात आली. तसेच सर्व रुग्णांना मेसर्स संग्राम एंटरप्रायजेसचे संग्राम जोशी यांच्या वतीने सुमारे चाळीस हजार रुपयांची औषधे विनामूल्य वाटण्यात आली. आरोग्य शिबीरात तज्ज्ञांनी तालुक्यातील गरीब, गरजू मुले, स्त्रीया, तरुण व वृद्ध तसेच आदिवासी रुग्णांची सखोल तपासणी करून विनामूल्य औषधे वितरीत केले गेले. या शिबीरास पाली येथील कोकण पदवीधर संस्थेचे संस्थापक बा. के. मराठे, डॉ. श्रीपाद बोडस यांच्या पत्नी डॉ. अंजली बोडस यांच्यासह देवेंद्र शहा, संग्राम जोशी, अर्चना जोशी, श्री. व सौ. सोहोनी व कोकण पदवीधर नर्सिंग क्लासेसच्या विद्यार्थिनी आदींचे सहकार्य लाभले. 

सुधागड तालुक्यासारख्या आदिवसी बहुल व डोंगराळ भागात अशा प्रकारचे आरोग्य शिबीर राबविल्यामूळे अनेकांनी आयोजकांचे आभार मानले. शिबीरास सुधागड प्रतिष्ठानचे सल्लागार सदाशिव स. लखिमले, राजेश बामणे, सुरेंद्र खाडीलकर, मनिषा मराठे,सुहास यादव, दत्ता यादव यांच्यासह श्री काळभैरव सहकारी सेवाभावी संस्था भार्जे अध्यक्ष प्रदीप धनावडे व सदस्य सुनील ठाकूर आदी उपस्थित होते.

Web Title: Marathi news pali news raigad free health check up camp