पालीत 'एक संघर्ष समाजसेवेसाठी'

अमित गवळे 
मंगळवार, 23 जानेवारी 2018

पाली - पालीची जुनी ओळख असलेले शिवाजीमहाराज स्मारक येथे खुपच जीर्ण झालेली झाडे झुडपे आणि अस्वच्छता यामुळे आत काय आहे हेच कळत नव्हते. "एक संघर्ष समाजसेवेसाठी" या समुहातील सदस्यांचे या जागेकडे लक्ष गेले. या समुहाने काही स्थानिकांना हाताशी घेऊन स्मारकाचा कायापालट केला. जातपात, धर्म विसरुन अगदी लहानग्यांसह मोठ्यांनी देखील हातात झाडू, फावडे, कुदळ, कोयता, झाड छाटण्याची कैची आदी सामग्री घेऊन कामाला सुरवात केली. स्मारकाची व आजुबाजूच्या परिसराची सफाई केली. रात्री बारापर्यंत हे सफाईचे काम चालले. 

ललित ठोंबरे या सदस्यांची दिड वर्षाची चिमुरडी रिद्धी हि सुद्धा हातात झाडू घेऊन कामाला लागली होती. संपुर्ण स्मारक आणि आजुबाजूचा परिसर चकाचक करुन स्वच्छ केला. यापुढे पैशांची जमवाजमव करुन स्मारकाची रंगरंगोटी, सुशोभिकरण करण्याचे व झाडे लावण्याचे सदस्यांनी ठरविले आहे. त्यासाठी सर्वचजण आपापल्या परिने कामाला लागले आहेत. गावातील विविध समस्या लोकसहभागातून सोडविण्यासाठी तसेच लोकप्रतिनीधी व प्रशासनाचे याकडे लक्ष वेधण्यासाठी पालीतील होतकरु तरुण व सुज्ञ नागरीक पुढे सरसावले. त्यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून एकत्र येऊन व्हॉट्सअपवर "एक संघर्ष समाजसेवेसाठी" हा गृप तयार केला. त्याद्वारे नागरीकांनी गावच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध राहण्याचा निर्धार केला आहे. 'सकाळ' बातमीच्या माध्यमातून या सर्व कामांची दखल घेत आहे.

सुरवातीला येथील मधल्या आळितील तलावात असलेल्या घाणीचा प्रश्न हाती घेतला गेला. परिणामतः ग्रामपंचायतीकडून हे तळे साफ करण्यात आले. त्यानंतर पाली प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रश्न गंभीर असल्याचे निदर्शनास आले. तसेच पाली येथे वर्षभरापुर्वी ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय उभारायचे उद्घाटन झाले. पण तेथे रीकाम्या जागेशिवाय काहीच नाही! भुमीपुजन होऊन देखील अजून कोणतेच पाऊल उचलेल गेलेले नाही. याची माहिती घेण्यासाठी सर्व सदस्यांनी थेट येथील प्राथमिक आरोग्य केंद्र गाठले. तेथील वैद्यकिय अधिकाऱ्यांना भेटून त्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सदस्य काम करत आहे. तसेच पालीतील कचरा समस्या आणि स्मशानभुमीची दुरुस्ती करण्याचे नियोजन ग्रुपने केले आहे.

Web Title: marathi news pali social work group clean