पल्स पोलिओ मोहीम; देवरुखला ११० मुलांना दिला डोस

प्रमोद हर्डीकर
रविवार, 28 जानेवारी 2018

साडवली - आरोग्य विभागामार्फत शासन पल्स पोलिओ मोहीम प्रभावीपणे राबवत आहे. पालकांनीही पाल्याची काळजी घेत या मोहिमेला चांगला प्रतिसाद दिला आहे. भविष्यात भारत यामुळे निश्चितच पोलीओमुक्त होणार आहे, असा विश्वास सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आर्ते यांनी व्यक्त केला. देवरुख ग्रामीण रुग्णालयाच्यावतीने बसस्थानक परीसरातील पोलिओ बुथवरील डोस देण्याच्या मोहीमेचे उद्धाटन युयुत्सु आर्ते यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आर्ते बोलत होते. 

देवरुख बसस्थानक परीसरातील पल्स पोलिओ मोहीमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी देवरुख नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष अभिजित शेट्ये, आरोग्यसेविका जाहीदा केळकर, आशावर्कर जाहिदा केळकर, दिनेश बोडकर आदी उपस्थित होते. देवरुख बसस्थानक परीसरात २८, २९, ३० असे तीन दिवस हा पोलिओ डोस देण्यात येणार असल्याचे आरोग्यसेविका आर. आर. कदम यांनी सांगितले. युयुत्सु आर्ते यांनी पल्स पोलिओ मोहीम प्रभाविपणे राबवली जात असल्याने पोलिओ मुक्त भारत असे ठामपणे आता म्हणता येणार आहे. पालकांनी या राष्ट्रीय मोहीमेस सहकार्य करण्याचे आवाहनही आर्ते यांनी केले.

Web Title: marathi news Pulse Polio Campaign