खराब हवामानाचा कडधान्य पिकाला फटका व रोगांची लागण

लक्ष्मण डुबे 
मंगळवार, 26 डिसेंबर 2017

रसायनी (रायगड) : रसायनी परिसरात रब्बी हंगामातील कडधान्य पेरणीचे क्षेत्रफळ वाढल आहे. मात्र निसर्गाच्या लहरीपणाचा फटका यावर्षी कडधान्याच्या पिकाला बसला आहे. खराब हावामानामुळे वाल आणि इतर पिकांवर कीडीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे शेतकरी हवालदील झाले आहेत. 

खरीपाच्या भात पिकानतंर वडगाव, आपटा, सावळा, मोहोपाडा, चावणा पंचक्रोशीतील शेतक-यांनी रब्बीच्या हंगामात वाल, हरभरा, मुग, चवळी आदी कडधान्यांच्या पिकांची पेरणी केली आहे. वाल आणि इतर कडधान्याला चांगला भाव मिळत असल्याने परीसरात कडधान्यांच्या पेरणीचे क्षेत्रफळ मागील दोन वर्षांपासून वाढू लागले आहे. 

कडधान्यांची पेरणी झाली, रोप उगवल्यानंतर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात ढगाळ हवमान व बीगर मौसमी पाऊस पडला. या खाराब हावामानामुळे वालाच्या पिकांवर बामणी आणि तेल्या रोग पडला आहे. असे जांभळे यांनी सांगितले. तर बामणी रोगामुळे वालाची झाड शेतात पिवळी पडलेले दिसतात. तसेच चवळी, मटकी, मुग, हरभरा या पिकावर तेल्या, मुरडा रोग पडू शकतो आशी भिती शेतक-यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान खराब हवामानाचा चांगलाच फटका यंदाच्या वर्षी कडधान्याच्या पिकाला बसणार आहे. त्यामुळे शेतकरी चितांतूर झाले आहे.

Web Title: Marathi news raigad news crops getting affected due to bad weather