ग्रामस्थांनी लोकसहभागातून बांधली स्मशानभूमी

अमित गवळे
सोमवार, 29 जानेवारी 2018

पाली (रायगड) : सुधागड तालुक्यातील केशवनगर गावतील लोकांची मरणानंतरची वाट अतिशय बिकट होती. कारण गावात आजतागायत स्मशानभूमीच नव्हती. त्यामुळे मृतदेह ओसाड कातळावर दहन केले जात असत. लोकप्रतिनीधी, ग्रामपंचायत आदिंकडे स्मशानभूमी बांधून देण्याची मागणी ग्रामस्थ वर्षानुवर्षे करत होते. परंतू कोणीही त्यांची दखल घेतली नाही. परिणामी गावातील तरुणांनी एकत्र येऊन लोकसहभागातून स्मशानभूमी उभी केली. 

केशनवनगर गावात जवळपास दोनशेहुन अधिक लोकसंख्या पण हक्काच्या स्मशानभूमीचा पत्ता नव्हता. त्यामुळे मृतदेहाला दफन करतेवळी खुप अडचणी येत असत. पावसाळ्यात तर सगळ्यात जास्त त्रास सहन करावा लागे. यासंदर्भाग ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधी व ग्रामपंचायतीकडे वारंवार स्मशानभूमी बांधून देण्याची मागणी केली. एवढेच काय तर प्रत्येक निवडणूकीत स्मशानभूमी बांधण्याची विनंती केली. मात्र कोणीच लक्ष दिले नाही. 

लोकप्रतिनिधी किंवा उमेदवार सांगत जागा दया मग बांधून देतो. अशी वर्षानुवर्षे उलटली परंतू स्मशानभूमी काही कोणी बांधून दिली नाही. मग अखेर गावातील तरूण पुढे सरसावले. त्यांनी गावकऱ्यांना साद घातली. बघता बघता सर्वजण एकत्र आले आणि स्मशानभूमी बांधण्याचा निर्णय झाला. यासाठी मग कोणी सिमेंट दिले, कोणी लोखंडी पाईप दिले तर कोणी वाळू दिली. गावातील लोकवर्गणीचा देखील वापर केला गेला. गावकऱ्यांनी मिळून लोकसहभाग व श्रमातून स्माशनभूमी बांधून सर्वांसमोर एक आदर्श घालून दिला आहे. स्मशानभूमी बांधण्यासाठी गावातील गजानन काटकर, लक्ष्मण शितोळे, दिपक कदम, सचिन मांदाडकर, उमेश पातेरे आदी तरुण व ग्रामस्थांचा हिरहिरीने पुढाकार होता. गावातील महिलांचा देखील उत्स्फुर्त सहभाग होता.

Web Title: Marathi news raigad news Graveyard participation of villagers