बल्लाळेश्वराच्या माघी मासोत्सवानिमित्त पालीत फुलला भक्तिमळा

अमित गवळे
रविवार, 21 जानेवारी 2018

श्री गणेश मंडळ या संस्थेमार्फत नाटकाचा प्रयोग सादर केला जाणार आहे. पाली पोलिस निरीक्षक दशरथ पाटील यांच्यासह बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टचे सरपंच अॅड. धनंजय धारप, उपसरपंच जितेंद्र गद्रे, विश्वस्त माधव साने, विनय मराठे, उपेंद्र कानडे, सचिन साठे, राहूल मराठे अादींनी योग्य नियोजन व व्यवस्थापन केले.

पाली : अष्टविनायक देवस्थानांपैकी एक बल्लाळेश्वराचे स्थान पालीत आहे. श्री बल्लाळ विनायकाचा माघ मासोत्सवानिमित्त पालीत रविवारी (ता.२१) हजारो भाविकांनी मोठी गर्दी केली. यानिमित्त पाली शहरात भव्य जत्रा भरली आहे. मंदिर व मंदिर परिसरात सर्वत्र अाकर्षक रोषणाई करण्यात आली. संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरातून अालेल्या भाविकांनी बल्लाळेश्वराचे दर्शन घेतले. काही जण तर अादल्या दिवशी पायी दर्शनासाठी अाले.

शनिवारी (ता.२०) मध्यरात्रीपासूनच भाविकांनी बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. रविवारी (ता.२१) सकाळी पाच वाजता मंदिर उघडल्यावर भाविकांनी बल्लाळेश्वराचे दर्शन घेतले. दुपारी उशिरापर्यंत दर्शनासाठी भाविकांच्या मंदिराबाहेर रांगा लागल्या होत्या. भाविकांच्या सोयीसाठी अनेक स्वयंसेवी संस्थांनी मोफत पाणी पुरवठा व अल्पोपहाराची व्यवस्था केली होती. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ लावण्यात आलेल्या मोठ्या स्क्रिनवर बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्ट तर्फे करण्यात आलेल्या व नियोजित कामंची माहिती दाखविण्यात येत होती.

माघ महोत्सवानिमित्त पाच दिवस रोज रात्री कीर्तन, गायन, प्रवचन, भजन आदी कलांसह विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जात आहेत. शु.चतुर्थीला रविवारी (ता.२१) श्री जन्माचे अख्यान झाले व सायंकाळी श्रींची पालखी मिरवणूक संपूर्ण गावातून उत्साहात निघाली. या मिरववणुकीसमोर वारकरी भजन, स्थानिक एकादशी मंडळाचे भजन, लेझिम नाचणारे घोडे, नाशिक बाजा व बँड वाजविले जातात. चतुर्थीच्या दिवशी रविवारी(ता.२१) रात्री श्रीं समोर महानैवेद्दय दाखवला जाणार अाहे. तो पाहण्यासाठी लाखो भाविक पहाटेपासूनच रांगा लावून उभे राहतील.पंचमीला सोमवारी (ता.२२) सर्व भक्तांना भोजनाचा महाप्रसाद दिला जाणार अाहे. 

तसेच श्री गणेश मंडळ या संस्थेमार्फत नाटकाचा प्रयोग सादर केला जाणार आहे. पाली पोलिस निरीक्षक दशरथ पाटील यांच्यासह बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टचे सरपंच अॅड. धनंजय धारप, उपसरपंच जितेंद्र गद्रे, विश्वस्त माधव साने, विनय मराठे, उपेंद्र कानडे, सचिन साठे, राहूल मराठे अादींनी योग्य नियोजन व व्यवस्थापन केले.

योग्य नियोजन व व्यवस्थापन

भाविकांना रांगेत व शिस्तबध्दपणे दर्शन घेता यावे याकरीता देवस्थान ट्रस्ट व पोलिस प्रशासन व पाली ग्रामपंचायतीच्या वतीने योग्य त्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या. दर्शनासाठी आलेल्या भाविकांना मनिडोअर स्टँड व एसटी स्टँडवरुन देवळापर्यंत अाणण्यासाठी देवस्थानातर्फे मोफत वाहतूक व्यवस्था केली गेली होती. 

वाहतुकीला अडथळा होणार नाही याची खबरदारी पाली पोलिस आणि देवस्थानचे सुरक्षारक्षक घेत होते. उत्सवादरम्यान रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात आली होती. भाविकांना प्रसाद व पिण्याची पाण्याची व्यवस्था करण्यात आली. सहा अग्निरोधक यंत्र बसविण्यात अाले होते. सुरक्षा व्यवस्थेसाठी एक पोलिस निरीक्षक, सहा पोलिस उपनिरीक्षक आणि ९२ पोलिस कर्मचारी तैनात होते.

Web Title: Marathi news raigad news pali news maghi masotsav celebrated