युवकांना करियर मार्गदर्शन देणारे गेटटुगेदर 

Getogether
Getogether

पाली (रायगड) : श्रीवर्धनसारख्या दुर्गम भागातील युवकांना भविष्यात करियरच्या वाटा दाखवून त्यांना सक्षम करण्याचा संकल्प येथील र. ना. राऊत माध्यमिक शाळेतील माजी विदयार्थ्यांनी केला. नुकतेच शाळेतील 1998 मधील दहावीच्या बॅचच्या विदयार्थ्यांचा गेट टुगेदर कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी माजी विदयार्थ्यांनी आपल्या शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करून त्यांचा सत्कार देखील केला. 

हे माजी विद्यार्थी सध्या विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. कोणी बँक मॅनेजर, अभियंता, प्राध्यापक, पत्रकार तर कोणी स्वतःचे व्यवसाय करत आहे. मात्र आपल्या काळात दहावी व बारावी नंतर पुढील शिक्षण कोणते घ्यावे? करियरच्या कोणत्या वाटा निवडाव्यात याबद्दल संभ्रमावस्था होती. परिणामी तालुक्यातील भौगोलिक परिस्थिती व उच्च शिक्षणासाठीच्या मर्यादा पाहता येथील युवकांना पुढील शिक्षणाचे व करियरचे मार्गदर्शन देऊन सक्षम करण्याचा निर्णय यावेळी सर्वानुमते घेण्यात आला. त्याप्रमाणे प्रत्येकाने मिळेल तसा वेळ देऊन तालुक्यातील विद्यार्थ्यांपर्यंत विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून पोहचण्याचा निर्णय घेतला. 

यावेळी या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांचा पुष्प व भेटवस्तू देऊन सत्कार केला आणि त्यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त केली. शिक्षकांनी विदयार्थ्यांच्या विविध आठवणींना उजाळा दिला. माजी विदयार्थ्यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. अशा प्रकारे हा गेटटुगेदरचा कार्यक्रम अनोख्या पद्धतीने संपन्न झाला. यावेळी दत्ता पाबरेकर, कुणाल आमले, योगेश शिंदे, मोहित जैन, कुलदिप पाटील, योगेश माळी, पंकज वाळवटकर, सुबोध पांढरकामे, अनंता राठोडकर, महेंद्र नेवरेकर, राजेश पाटील, रोहन चौगले, समीत वाणी, संतोष वर्मा, विजेंद्र भगत व नयन गुरव हे माजी विद्यार्थी उपस्थित होते. तर,एस.ए. जोशी, एस.बी. रुदरावार, एस.एस. वैद्य, डि.डि.शिंदे, एम.व्ही. जगताप, एन.व्ही. अर्जून, एस.आर. गरंडे, ए.ए. वैद्य,जे.एस. वालवाटकर, ए.डी. पडवळ, एस.एस. पालकर, एम.यू. गोरे, आर. आर. सांबरे आणि ए.सी. कुलकर्णी हे शिक्षक उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com