शरिरसौष्ठवपटू बनण्याचे स्वप्न बाळगून तो करतोय वेटरचे काम

अमित गवळे
मंगळवार, 9 जानेवारी 2018

मला अांंतरराष्ट्रीय दर्जाचा शरिरसौष्ठवपट्टू बनुन देशाचे नाव करायचे आहे. सर्वप्रथम "महाराष्ट्र श्री" बनायचे आहे. अांतराष्ट्रिय शरिरसौष्ठवपट्टू अन्राॅल्ड स्वाॅइत्झर हे माझे अादर्श आहेत. पैसे अाणि चांगले मार्गदर्शन मिळाल्यास प्रचंड मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर एका वर्षात अधिक पिळदार शरीर कमावुन दाखवेन. तसेच मला अभिनय क्षेत्रात देखिल नाव कमवायचे आहे. माझे हे स्वप्न पुर्ण करण्यासाठी मला दानशुर व्यक्तिंच्या मदतीची गरज आहे.
- अंकुश निवृत्ती तावरे, शरिरसौष्ठवपट्टू

पाली : घरी अठराविश्वे दारिद्र्य, नकळत्या वयातच अाईचे छत्र हरपले.… अाणि समजू लागल्यावर बापाची साथ सुटली...मग मिळेल ते काम करत देईल त्याच्या ओसरीचा अासरा घेत तो तरुण एकटाच अापले अायुष्य जगत अाहे. पण उरी अाहे एक मोठे स्वप्न ते म्हणजे अांतरराष्ट्रिय शरिरसौष्ठवपटू बनण्याचे. त्यासाठी तो प्रचंड मेहनत घेवून विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेत आहे.

या बाविस वर्षाच्या तरुणाचे नाव अाहे अंकुश निवृत्ती तावरे. तो मुळचा अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी या गावातील अाहे. मागील वर्षभरापासून तो पालीत अाश्रयीत म्हणून राहत अाहे. सध्या येथील एका हाॅटेलमध्ये तो वेटरचे काम करतो.तिसरीत असतांना अंकुशची अाई अाजारपणात गेली. मग अंकुशची शाळा देखिल सुटली. घरी अठराविश्वे दारिद्र वडीलांचे वय देखिल अधिक ते बिगारी, हातमजुरी करत. त्यांच्या सोबत मग मिळेल ते काम करत प्रसंगी ट्रेन व बसमधून भिका मागून पोटाची खळगी भरु लागला. चार वर्षापुर्वी वडिलांचे छत्र देखिल हरपले. जूळीचा भाऊ पुण्यात निघुन गेला. अंकूशने सांगितले कि लहानपणी काम करण्याची ताकद नव्हती, पोटात चार घास पडावे यासाठी मग ट्रेन,बसमध्ये भिक मागायचो. पण तेथूनही इतर भिकारी पिटाळून लावायचे. बर्याचवेळेला उपाशीपोटीच झोपावे लागायचे. हळू हळू तो मिळेल ते काम करुन गुजरान करु लागला. गवंड्यांच्या हाताखाली तर कधी हाॅटेलमध्ये काम करत होता. यावेळी शरिरशौष्ठव स्पर्धांबद्दल माहिती मिळाली. मग सोळाव्या वर्षापासून व्यायामाला सुरुवात केली. अवघ्या काहि दिवसांतच प्रचंड मेहनतीने त्याने पिळदार शरिरयष्ठी कमावली. 

गाव, तालुका व जिल्हा स्तरापासून ते पुण्या मुंबईतील शरिरसौष्ठव स्पर्धांमध्ये सहभागी होऊ लागला. एका स्पर्धेत मिस्टर इंडिया सुहास खामकरच्या भेटीन प्रेरणा मिळाली. पठ्ठ्याने संगमेश्वर, बदलापुर-मुंबई व पिंपरी चिंचवड येथे झालेल्या "महाराष्ट्र श्री" स्पर्धेत सहभाग घेतला आहे. "नगर श्री" मध्ये तर त्याने चक्क अाठ वेळा सहभाग घेतला आहे. असे अंकुशने सकाळला सांगितले.भले त्याच्या हाती या स्पर्धांमधून कोणतेच बक्षिस आले नाही परंतू त्याच्या या दुर्दम्य इच्छाशक्तीची तारिफ मात्र अनेकांनी केली.अहमदनगर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांनी अंकुशला अार्थिक मदत केली. अनेक स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी शिफारस पत्र देखिल दिले. अशा काही लोकांनी त्याला वेळोवेळि मदतीचा हात दिला. तालुका व इतर अनेक लोकल शरिरसौष्ठव स्पर्धांमध्ये त्याने सहभाग घेवून बक्षीस मिळविले आहे.पालीत मागील वर्षी ओके फिटनेस जिमतर्फे झालेल्या शरिसौष्ठव स्पर्धेत त्याने प्रथम पारितोषिक मिळविले आहे. त्याला जवळचे असे कोणी नातेवाईक नाही. पालीतील मानलेले नातेवाईक रोहिदास अामरे यांनी त्याला कामासाठी गावावरून पालीत अाणले. त्यानंतर तो येथील अविनाश शिदोरे यांच्याकडे वास्तव्यास आहे. ते देखिल त्याला अगदी मुलाप्रमाणे सांभाळतात. 

सध्या मिळेल त्या वेळेत कामकरुन तो व्यायाम देखिल करत आहे. परंतू पुरेसी डायट, पैसे अाणि मार्गदर्शनाच्या अभावामुळे त्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अापले स्वप्न साकार करण्यासाठी राजकीय पुढारी व दानशूर व्यक्तीने पुढे येवून सढळ हस्ते मदत करण्याची हाक अंकुशने दिली आहे.

अभियनयात हि अावड
अंकुशला अभिनयाची देखिल पुष्कळ अावड आहे. गावात येणार्या एका सिने क्षेत्रातील व्यक्तीसोबत त्याची ओळख झाली. त्यांच्या सोबत तो मुंबईला जावू लागला मग त्यांच्या ओळखीने एका प्रसिद्ध दिग्दर्शकाकडे काही महिने काम केले. त्यांनी त्याला त्यांच्या "बब्या"या चित्रपटात पंधरा मिनिटांचा रोल दिला. परंतू हा चित्रपट काही रिलिज होऊ शकला नाही. तेव्हा पासूनच शरिरसौष्ठवपट्टू बनण्याबरोबरच अभिनेता बनण्याचे स्वप्न देखिल अंकुशने उराशी बाळगले आहे.

मला अांंतरराष्ट्रीय दर्जाचा शरिरसौष्ठवपट्टू बनुन देशाचे नाव करायचे आहे. सर्वप्रथम "महाराष्ट्र श्री" बनायचे आहे. अांतराष्ट्रिय शरिरसौष्ठवपट्टू अन्राॅल्ड स्वाॅइत्झर हे माझे अादर्श आहेत. पैसे अाणि चांगले मार्गदर्शन मिळाल्यास प्रचंड मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर एका वर्षात अधिक पिळदार शरीर कमावुन दाखवेन. तसेच मला अभिनय क्षेत्रात देखिल नाव कमवायचे आहे. माझे हे स्वप्न पुर्ण करण्यासाठी मला दानशुर व्यक्तिंच्या मदतीची गरज आहे.
- अंकुश निवृत्ती तावरे, शरिरसौष्ठवपट्टू

Web Title: Marathi news Raigad news social

टॅग्स