रायगडमधील विदयार्थ्यांनी दिला तंबाखूमुक्त महाराष्ट्राचा नारा

अमित गवळे
सोमवार, 5 फेब्रुवारी 2018

पाली (रायगड) : सुधागड तालुक्यातील रा.जि.प.शाळा पायरीचीवाडी येथे विदयार्थ्यांनी तंबाखूमक्तीसाठी जनजागृती केली. यावेळी विदयार्थी, शिक्षक, पालक व ग्रामस्थांनी तंबाखूमुक्तीची शपथ घेतली. "तंबाखूमुक्त महाराष्ट्राचा नारा…" दिला. 

पाली (रायगड) : सुधागड तालुक्यातील रा.जि.प.शाळा पायरीचीवाडी येथे विदयार्थ्यांनी तंबाखूमक्तीसाठी जनजागृती केली. यावेळी विदयार्थी, शिक्षक, पालक व ग्रामस्थांनी तंबाखूमुक्तीची शपथ घेतली. "तंबाखूमुक्त महाराष्ट्राचा नारा…" दिला. 

राज्यातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्याना व सर्व संबधितांना तंबाखूमुक्तीची शपथ देण्याचे राज्य शासनाने ठरविले आहे. पण हा उपक्रम फक्त विद्यार्थ्यांपुरताच मर्यादित न राहता पालक व ग्रामस्थांना या उपक्रमात सहभागी करुन विद्यार्थ्यांमार्फत प्रबोधन केले तर, ही कल्पना शाळेचे शिक्षक कुणाल पवार यांच्या मनात आली. त्यांना मुख्याध्यापिका हेमलता कडाळी यांनीही साथ दिली. त्याप्रमाणे सर्वप्रथम विद्यार्थ्याची गावातून तंबाखुमूक्त जनजागृतीपर प्रभातफेरी काढण्यात आली. 

यावेळी विद्यार्थ्यांनी "चला घडवूया, तंबाखूमुक्त महाराष्ट्र", "मी तंबाखू खाणार नाही, दुसऱ्याला खाऊ देणार नाही", "पप्पा, दादा, काका, मामा सोडा तंबाखू आता" अशा घोषणा देऊन समस्त ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेतले. या वेळेस जमलेल्या पालकांचे व ग्रामस्थांचे विदयार्थ्यानी तंबाखूचे दूष्परिणाम सांगून प्रबोधन केले. पालक व ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनाला टाळ्या वाजवून दाद दिली व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. त्यानंतर सर्व विद्यार्थी, शिक्षक, पालक व ग्रामस्थांनी शाळेत जाऊन तंबाखूमुक्तीची शपथ घेतली. 

विद्यार्थ्यांचे बालमन हे संस्कारक्षम व अनुकरणप्रिय असते. या वयात आपण त्यांच्यावर चांगले संस्कार केल्यास ते चिरकाल टिकतात. आज विद्यार्थ्यांबरोबरच ग्रामस्थांमध्येही तंबाखू सेवनाच्या दुष्परिणामाची जाणीव निर्माण झाली पाहिजे. दुसऱ्याने कोणी सांगितले तर कदाचित फारसा बदल होणार नाही. विद्यार्थ्यांनी विशेषत: आपल्या पाल्यांनी अशी जाणीव करुन दिल्यास निश्चितच बदल झालेला दिसेल, असे मत कुणाल पवार यांनी व्यक्त केले.

 

Web Title: Marathi news raigad news tobacco free oath