मुंबई गोवा महामार्गावर दोन ट्रकमध्ये भीषण अपघात

अमित गवळे
गुरुवार, 8 मार्च 2018

पाली (रायगड) : मुंबई गोवा महामार्गावर गुरुवारी (ता.8) पहाटे साडे पाच वाजताच्या सुमारास दोन ट्रकची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. यावेळी एका दुचकीस्वाराला देखील ट्रकची धडक लागली. हा अपघात मुंबई गोवा महामार्गावर लोणेरे आणि माणगावच्या दरम्यान ऊसरघर गावाजवळ हॉटेल गुरुप्रसाद समोर झाला.

यातील एक ट्रक माणगाव बाजू कडून महाड बाजुकडे अतिवेगात जात असतांना विरुद्ध बाजूस जावून महाड बाजुकडून माणगाव बाजुकडून येणाऱ्या ट्रकला समोर धडकला.  हा अपघात इतका भयानक होता की या दोन्ही ट्रकनी ताबडतोब पेट घेतला. यात दोन्ही ट्रकचे चालक आणि क्लीनर पूर्णपणे जळून गेले. तर अपघातग्रस्त मोटारसायकलस्वार तुषार गावडे (वय 33) जागीच ठार झाला. ट्रकमधील चार मृतांची नावे समजू शकली नसून त्यांची ओळख पटलेली नाही. 

Web Title: Marathi news raigad news truck accident 5 dies