रायगड जिल्हायातील वासांबे मोहोपाडा येथील तळ्याचे सुशोभिकरण

लक्ष्मण डुबे
गुरुवार, 25 जानेवारी 2018

रसायनी (रायगड) : वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीने गावातील तळ्याचे सुशोभिकरणाचे काम सुरू केले आहे. तळ्याच्या परीसरात कचऱ्यामुळे परीसर अस्वच्छ झाला होता. त्यामुळे नागरिक नाराजी व्यक्त करत होते. दरम्यान ग्रामपंचायतीने तळ्याचे सुशोभिकरणाचे काम सुरू केल्याने नागरिक समाधान व्यक्त करत आहे. 

येथील तळ्यावर सायंकाळी नागरिक विरंगुळ्यासाठी येत आसतात येथे येणाऱ्यांना चांगली सुविधा मिळावी त्यासाठी ग्रामपंचायतीने तळ्याचे सुशोभिकरणाचे काम सुरू केले आहे. तळ्याच्या बाजुच्या खाच खळग्यात मातीचा भरावा करून झाडे व हरळ लावण्यात येणार आहे. तसेच येथील खोलीची डागडुजी करून ज्येष्ठ नागरिक व इतरांनसाठी कॅरम व बुध्दीबळ खेळण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अशी माहिती सरपंच कृष्णा पारंगे यांनी दिली आहे. 

तळ्याच्या परीसरातील कचरा वेचण्यात आला असून भराव्याचे काम सुरू आहे. तसेच तळीरामाच्या पार्ट्यांना आळा घालण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. तर तळ्याच्या परीसरात कचरा टाकू नये आणि कचरा करू नये तसेच परीसर स्वच्छ ठेवावा. असे अव्हान स्वच्छता समितीचे अध्यक्ष अरुण गायकवाड यांनी केले आहे.

Web Title: Marathi news rasayani news renovation of pont