शिवसेना महिला आघाडी संघटकपदी सारीका निकम

भगवान खैरनार
मंगळवार, 23 जानेवारी 2018

मोखाडा - आगामी विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिवसेनेने पालघर जिल्हयातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तया केल्या आहेत. तसेच महिला आघाडी पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तया केल्या आहेत. विक्रमगड विधानसभेतील जव्हार - मोखाडा तालुका संघटकपदी मोखाडा पंचायत समितीच्या माजी सभापती व विद्यमान सदस्य सारीका निकम यांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचे शिवसैनिकांनी व महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे. 

सारीका निकम या मोखाडा पंचायत समितीमध्ये वेगवेगळ्या गणांतून तीन वेळा निवडून आल्या आहेत. त्यामध्ये त्यांनी एकदा मोखाडा पंचायत समितीचे सभापती पद भुषविलेले आहे. सध्या त्या विद्यमान सदस्य आहेत. त्यांचा तालुक्यात सर्वच स्तरात दांडगा जनसंपर्क आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन पक्षप्रमुख ऊध्दव ठाकरे यांनी त्यांची महिला आघाडीच्या जव्हार - मोखाडा संघटकपदी निवड केली आहे. दरम्यान, आपण पक्ष आणि संघटना बांधण्यावर भर देणार असून आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत या भागातून शिवसेनेच्या उमेदवाराला मताधिक्य मिळवून देणार असल्याची प्रतिक्रीया सारीका निकम यांनी दिली आहे.
 
Web Title: marathi news shivsenas women sarika nikam