बनावट नोटा वटवून स्टेट बँक ऑफ इंडियाला फसवले

अमित गवळे  
मंगळवार, 12 डिसेंबर 2017

पाली : येथील स्टेट बँक ऑफ इंडिया पाली शाखेत बनावट नोटा वटवून बँकेची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी पाली पोलीस स्थानकात स्टेट बँक ऑफ इंडिया पाली शाखेचे व्यवस्थापक श्रीराम अय्यर यांनी सोमवारी (ता.11) तक्रार दिली. त्यानुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.    याबाबत सविस्तर माहिती अशी की पाली स्टेट बँकेत अज्ञात व्यक्तीने त्याच्याकडील बनावट नोटा या बनावट असल्याचे माहित असून देखील जमा केल्या. या प्रकरणी बँक व्यवस्थापनाकडून नोटा तपासणीकरीता पाठविण्यात आल्या होत्या.

पाली : येथील स्टेट बँक ऑफ इंडिया पाली शाखेत बनावट नोटा वटवून बँकेची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी पाली पोलीस स्थानकात स्टेट बँक ऑफ इंडिया पाली शाखेचे व्यवस्थापक श्रीराम अय्यर यांनी सोमवारी (ता.11) तक्रार दिली. त्यानुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.    याबाबत सविस्तर माहिती अशी की पाली स्टेट बँकेत अज्ञात व्यक्तीने त्याच्याकडील बनावट नोटा या बनावट असल्याचे माहित असून देखील जमा केल्या. या प्रकरणी बँक व्यवस्थापनाकडून नोटा तपासणीकरीता पाठविण्यात आल्या होत्या. या नोटा बनावट असल्याचे सिध्द झाल्यानंतर पाली स्टेट बँकेचे शाखा व्यवस्थापक श्रीराम अय्यर यांनी याबाबत पाली पोलीस स्थानकांत तक्रार दिली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरिक्षक दशरथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एस. बी. पाटील करीत आहेत.

 

Web Title: Marathi news state bank of India trapped in duplicate notes