राजिप शाळा पळसगावची चमकदार कामगिरी

Marathi News_Raigad_Palasgaon_The Rajip School Palsgaon (Bu).
Marathi News_Raigad_Palasgaon_The Rajip School Palsgaon (Bu).

पाली (जि. माणगाव) - शाश्वत विकासासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून माणगाव तालुक्यात विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. लोणेरे येथील एस.एस. निकम इंग्लिश मीडियम स्कुल येथे हे प्रदर्शन पार पडले. या प्रदर्शनात राजिप शाळा पळसगाव (बू.) यांच्या प्रतिकृतीने प्राथमिक गटातून द्वितीय क्रमांक पटकावला.

विज्ञान प्रदर्शनात राजिप शाळा पळसगावची (बू.) अंजली अंकुश तांबे हिने भूकंप सूचक यंत्राची प्रतिकृती तयार केली होती. या प्रदर्शनात प्राथमिक गटातून एकूण 50 विज्ञान प्रतिकृती सहभागी केल्या गेल्या होत्या. त्यापैकी 12 प्रतिकृती जिल्हा परिषद शाळेच्या होत्या. त्यामधून अंजलीच्या प्रतिकृतीस द्वितीय क्रमांक मिळाला. ही प्रतिकृती तयार करण्यास अंजलीला शाळेच्या शिक्षिका अपर्णा विनायक जंगम यांचे अमूल्य मार्गदर्शन लाभले. शाळेतील मुख्याध्यापिका चैत्राली पाटील, पदवीधर शिक्षक अशोक जाधव व स्मिता पाब्रेकर यांचे विशेष सहकार्य लाभले. अंजली सोबत संचित दिपक तांबे हिने प्रतिकृतीचे उत्तम प्रकारे सादरीकरण केले. त्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे. केंद्र प्रमुख पालवे सर यांनी शाळेचे विशेष कौतुक करून पुढील सहभागासाठी शुभेच्छा दिल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com