काजू लागवडीत घेतले झेंडूचे आंतरपीक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 सप्टेंबर 2018

पावस - विद्युत मंडळात नोकरी करीत असताना तेथे सतत कामात राहण्याच्या सवयीमुळे निवृत्तीनंतर घरी बसून राहण्यापेक्षा काजू लागवड करून त्यात आंतरपीक घेण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर झेंडू लागवड केली. त्यात नक्कीच यश मिळेल, असा विश्‍वास रत्नागिरी तालुक्‍यातील मावळंगे येथील प्रकाश सावंत-गुळेकर यांना आहे.

पावस - विद्युत मंडळात नोकरी करीत असताना तेथे सतत कामात राहण्याच्या सवयीमुळे निवृत्तीनंतर घरी बसून राहण्यापेक्षा काजू लागवड करून त्यात आंतरपीक घेण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर झेंडू लागवड केली. त्यात नक्कीच यश मिळेल, असा विश्‍वास रत्नागिरी तालुक्‍यातील मावळंगे येथील प्रकाश सावंत-गुळेकर यांना आहे. 

श्री. गुळेकर जिल्ह्यात सर्वच ठिकाणी फिरले. त्यात गावात जमीन असूनही व्यवस्थित लक्ष देता येत नव्हते. काही प्रमाणात हापूस आंबा कलम लागवड केली. निवृत्तीनंतर आपल्या मोकळ्या जागेत काहीतरी लागवड करावी व त्या कामात व्यस्त राहावे, असा त्यांचा विचार होता.

कृषी सहायक श्‍याम माळशिकारे यांच्या संपर्कात आल्यानंतर जुलै २०१८ मध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत १०० काजूची लागवड केली. लागवडीतील अंतर २१ फुटांचे असल्याने देखभालीबरोबर आंतरपीक घेता येईल, या हेतूने मधल्या जमिनीत अप्सरा, कलकत्ता या वाणाची १००० झेंडू रोपांची लागवड केली.

याबाबत श्री. गुळेकर म्हणाले की, नवरात्रोत्सवात स्थानिक बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी असते. परजिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात झेंडू येत असताना आपल्या मातीतही चांगले पीक येते. याची खात्री पटल्याने त्यात लक्ष केंद्रित केले. सध्या फुले येण्यास सुरवात झाली आहे.

शिवारातून उत्पन्नाची संकल्पना  शासनाच्या फळलागवडीला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. कृषी विभागाच्या योजना बांधावर पोहोचण्यास मदत होत असल्याने आपल्या शिवारातून उत्पन्न मिळवण्याची संकल्पना सत्यता उतरवली. असाच संदेश प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचला पाहिजे, असे कृषी सहायक श्‍याम माळशिकारे यांनी सांगितले.

हा नवीन प्रयोग आहे. पाण्याचे योग्य नियोजन असल्यामुळे साखळी पद्धतीने लागवड करण्याचा मानस आहे. अशातऱ्हेने आंतरपिके घेऊन उत्पादन क्षमता वाढवणार आहे.
-प्रकाश सावंत गुळेकर,
शेतकरी

Web Title: Marigold intercrop in Cashew nut