Marleshwar Temple Accident : डोंगराच्या कड्यावरून दगड कोसळून मार्लेश्वरात 4 वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू; वडील, चुलते गंभीर जखमी, सांगलीच्या कुटुंबीयावर आघात

Marleshwar temple accident latest news : सांगलीतील कापूसखेड येथील पाटील कुटुंब मार्लेश्वर दर्शनासाठी आले असताना डोंगरावरून दगड कोसळला. या दुर्घटनेत चार वर्षीय रूत्वीचा मृत्यू झाला.
Sangli family accident at Marleshwar

Sangli family accident at Marleshwar

esakal

Updated on: 

देवरूख : निसर्गरम्य वातावरणात देवदर्शन आणि पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आलेल्या सांगली जिल्ह्यातील एका कुटुंबावर काळाने घाला घातला. श्री क्षेत्र मार्लेश्वर येथे शुक्रवारी (ता. १३) दुपारी एकच्या सुमारास डोंगराच्या कड्यावरून अचानक दगड कोसळून चार वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला, तर तिचे वडील आणि चुलते गंभीर जखमी झाले (Four year old girl dies at Marleshwar temple) आहेत. मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव रूत्वी संदीप पाटील (वय ४) असे असून तिचे वडील संदीप पाटील आणि चुलते प्रदीप पाटील (रा. कापूसखेड, ता. वाळवा, जि. सांगली) गंभीर जखमी झाले.

Loading content, please wait...