esakal | बोहल्यावरून नवरा डायरेक्ट गृह विलगीकरणात; पॉझिटिव्ह लपवणे पडले 50 हजाराला
sakal

बोलून बातमी शोधा

बोहल्यावरून नवरा डायरेक्ट गृह विलगीकरणात; पॉझिटिव्ह लपवणे पडले 50 हजाराला

बोहल्यावरून नवरा डायरेक्ट गृह विलगीकरणात; पॉझिटिव्ह लपवणे पडले 50 हजाराला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

गुहागर : स्वत: कोरोनाबाधित (covid-19) असल्याचे लपवून बोहल्यावर उभ्या राहिलेल्या नवरदेवाचे बिंग केवळ विवाह लांबल्यामुळे फुटले. त्यामुळे त्याला गृह विलगीकरणात जावे लागले. शिवाय नियमांचा भंग केल्यामुळे वरपक्षाला ग्रामपंचायतीने (grampanchayat) ५० हजाराचा दंड ठोठावला. यंत्रणेने विवाह (marriage) म्हणून कानाडोळा न करता सजगता दाखविल्यामुळे हा प्रकार उघड झाला. वर आणि वरपक्षापासून इतरांना होणाऱ्या संसर्गाला सध्यातरी पायबंद बसला. गुहागरात (guhagara)zs हा प्रकार घडला.

तालुक्‍यातील एका गावामधील वधू आणि आणखी दुसऱ्या गावातील वर यांच्या विवाहाची प्रांताकडून परवानगीही आणली होती. वधू आणि वराकडील मंडळींनी ४ मे रोजी अँटिजेन (antigen report) टेस्टही केल्या. ५ मे रोजी लग्नाचा मुहूर्त होता. ग्रामपंचायतीने वधूपक्षाकडील कोरोना अहवाल (covid-19 report) आधीच तपासले होते. विवाहाच्या दिवशी संबंधित गावाचे सरपंच, तलाठी, पोलिसपाटील, तंटामुक्त अध्यक्ष आणि ग्रामसेवक विवाहस्थळी गेले. त्यांनी वरपक्षाकडे कोरोना तपासणीचा अहवाल मागितला. वरपक्षाने आम्ही तपासणी केली आहे; मात्र रिपोर्ट आणले नाहीत, असे सांगितले. त्या वेळी विवाहात अडथळा नको, म्हणून प्रांताच्या आदेशाप्रमाणे विवाह पार पाडा, अशा सूचना करून सर्वजण परतले; मात्र या सर्वांच्या मनात अहवालाबाबत पाल चुकचुकत होती.

हेही वाचा: नंबर आला तरी लस मिळेना; नियोजनाअभावी केंद्रांवर नागरिकांची फरफट

तरीही नववधू गेली सासरी

नवरदेव बाधित असतानाही वधूकडील मंडळींनी मुलीची सासरी पाठवणी केली आहे. नवरदेव घरात गृहविलगीकरणात आहे.

भटजीलाही केला अटकाव

सदरचे लग्न लावून झाल्यावर येथील भटजी दुसरे लग्न लावण्यासाठी अन्यत्र जात होते; मात्र नवरा मुलगाच बाधित असल्याने प्रशासनाने भटजींना दुसऱ्या ठिकाणी जाण्यास अटकाव केला. दुसऱ्या लग्नाच्या ठिकाणी अन्य भटजी पाठविण्यास सांगून गृहविलगीकरणात राहण्यास सांगितले.

बाधित असल्याची कबुली

दरम्‍यान, दुपारी पुन्हा पंचायतीचे लोक विवाहस्थळी गेले. विवाह लांबल्याने ही सारी मंडळी तेथेच होती. त्यांची सखोल चौकशी केल्यावर वराने तो कोरोनाबाधित असल्याची कबुली दिली. प्रांताधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांचे उल्लंघन केल्याबद्दल ५० हजाराची दंडात्मक कारवाई ग्रामपंचायत प्रशासनाने केली. नवरा मुलगा बाधित असल्याने सर्वांना तातडीने गृहविलगीकरणात जाण्याच्या सक्त सूचना दिल्या.

हेही वाचा: जर्मनीचं कोरोनाविरोधी लढाईचं सूत्र; 'सेव्हन डे इन्सिडन्स'

loading image
go to top