मत्स्योत्पादनात कचऱ्याचा अडथळा

मत्स्योत्पादनात कचऱ्याचा अडथळा

रत्नागिरी - भारतात सुमारे ३.१५ दशलक्ष हेक्‍टर क्षेत्रात जलसाठे आहेत. या साठ्यांचा मत्स्योत्पादनासाठी उपयोग झाल्यास दोन ते पाच पटींने मत्स्योत्पादन वाढेल आणि नील क्रांती होईल, असा विश्‍वास ऑस्ट्रेलियातील जागतिक बॅंक व अन्न आणि कृषी संस्थेचे आंतरराष्ट्रीय मत्स्यतज्ञ मार्टिन एस कुमार यांनी केले. किनारपट्टी किंवा खाड्यांच्या भागात सागरी पर्यावरण आणि मत्स्योत्पादनाला हानिकारक कच-याचे व्यवस्थापन, हे आव्हान असल्याचे त्यांनी सांगितले.

शिरगाव येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत मत्स्य महाविद्यालय व इंटरडिसिप्लिनरी सोसायटी फोर ग्रिकल्चरल सायन्स अँड टेक्‍नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने ’शाश्वत मासेमारी आणि मत्स्य संवर्धन विकास: आव्हाने आणि संधी’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते.

ते म्हणाले , भारताच्या सागरी भागाबरोबरच देशांतर्गत पाणीसाठे आणि तलावांचा मत्स्योत्पादनासाठी वापर केला तर येथे ख-या अर्थाने ’नील क्रांती’ होऊ शकेल. सुमारे ७ लाख हेक्‍टर तलावांचे आणि ५ लाख हेक्‍टर इतर जल क्षेत्र आहे. पर्यावरणआधारित एकात्मिक  मत्स्यव्यवस्थापन गरजेचे आहे. मत्स्योत्पादनाच्या शाश्वत विकासासाठी किनारपट्टी व्यवस्थापनाचा तपशीलवार आराखडा करणे आवश्‍यक आहे.  मत्स्य साठ्यांची उपलब्धता आणि पर्यावरणाचे जास्त चांगले आकलन होण्यासाठी गरजांवर आधारित विशेष शास्त्रीय संशोधन केले तरच हे होऊ शकेल. मासेमारीसाठी उपलब्ध असलेले सुधारित तंत्रज्ञान आणि मत्स्योत्पादकांमध्ये असलेली दरी कमी करण्याबरोबरच जनुकशास्त्राचा उपयोग करून वेगाने वाढणा-या माशांच्या जाती या उत्पादकांना उपलब्ध करून दिल्या पाहिजेत.

या वेळी डॉ. जे. के. जेना, डॉ. जे. जयललिता कुलगुरू डॉ. एस. फेलिक्‍स, डॉ. गोपाळकृष्ण यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले.

पिंजरा शेती उपयुक्‍त
मत्स्यपालनातील वाढीतून भारत मत्स्य उत्पादक देशात भरारी घेत आहे. पिंजरा शेतीचा वापर केल्यास त्याचा फायदा होऊ शकतो. देशातील ३.० दशलक्ष हेक्‍टरपेक्षा अधिक उपलब्ध जलाशयांचे स्रोत प्रभावीपणे या आर्थिक उपक्रमांत सहभागी करून घेता येतील, अशी सूचना डॉ. जेना यांनी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com