सिंधुदुर्ग किल्ल्यावरील माती, जल एकत्रित 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 डिसेंबर 2016

मालवण : जय भवानी...जय शिवाजी...च्या जयघोष करत आज तालुका भाजपाच्या वतीने येथील ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्यासह तालुक्‍यातील गड-किल्ल्यांवरील माती व जल एकत्रित केलेला कलश गोरेगाव चौपाटी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या उभारल्या जाणाऱ्या भव्य स्मारकाच्या ठिकाणी रवाना करण्यात आला. या सोहळ्यानिमित्त किल्ले सिंधुदुर्ग दर्शनासाठी जनकल्याण महायाग कार्यक्रमात दाखल झालेल्या साधू-संतांचीही उपस्थिती लाभली होती. 

मुंबई समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य स्मारकाचे भूमिपूजन 24 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. या कार्यक्रमासाठी राज्यभरातील किल्ले, गडावरील माती व जल यांचे कलश नेण्यात येणार आहेत. आज तालुका भाजपाच्या वतीने तालुक्‍यातील प्रत्येक गड-किल्ल्यांमधील माती व जल एकत्र करत कलशाची शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. यात सिंधुदुर्ग किल्ला, भरतगड यांच्यासह अन्य गडावरील माती, जलकलशांचा समावेश होता. भव्य मिरवणुकीने हे कलश कसाल येथे नेऊन तेथून ते मुंबईसाठी रवाना करण्यात आले. 

येथील सिंधुदुर्ग किल्ला येथे भाजप पदाधिकाऱ्यांनी शिवराजेश्‍वर मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेत किल्ल्यातील माती व जल कलशात घेतले. या कार्यक्रमाच्या वेळी कणकवली येथे जनकल्याण महायागास आलेल्या साधू-संताचीही उपस्थिती लाभली. साधू-संतांनी या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करत या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला. या वेळी तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर, शहराध्यक्ष भालचंद्र राऊत, नगरसेवक राजन वराडकर, आपा लुडबे, गणेश कुशे, नगरसेविका पूजा सरकारे, दादा वाघ, उल्हास तांडेल, अरविंद मोंडकर, आर्या मयेकर, महेश मांजरेकर, भाऊ सामंत, बबन परुळेकर, किल्ला रहिवाशी मंगेश सावंत यांच्यासह शिवप्रेमी सहभागी झाले होते.

Web Title: material from Sindhudurga fort for chhatrapati shivaji maharaj statue in Mumbai