'कोकणात माझे कुटुंब, माझी जबाबदारी' योजना पोहोचली साडेदहा लाख कुटुंबांपर्यंत

maze kutumb mazi jababdari policy reached from above 10 lakh families in ratnagiri chiplun
maze kutumb mazi jababdari policy reached from above 10 lakh families in ratnagiri chiplun

चिपळूण : माझे कुटूंब माझी जबाबदारी या मोहीमेअंतर्गत शासकीय यंत्रणा कोकणातील 10 लाख 64 हजार 143 कुटूंबापर्यंत पोहचली आहे. हे अभियान कोकणात 25 टक्के पूर्ण झाले आहे. त्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समाधान व्यक्त केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज कोकण विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ आणि कोकणातील जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षक, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि टास्क फोर्सच्या अधिकार्‍यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे माझे कुटूंब माझी जबाबदारी या मोहीमेचा आढावा घेतला. 


नवी मुंबईल पोलिस आयुक्त बीपीनकुमार सिंग, कोकण पोलिस महानिरिक्षक निकीत कौशिक यांच्यासह रत्नागिरी, रायगड, पालघर, सिंधुदुर्ग, ठाणे या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी उपस्थित होते. कोकणात 1 कोटी 92 लाख 72 हजार 65 लोकसंख्या असून 48 लाख 66 हजार 372 इतकी कुटूंबसंख्या आहे. यासाठी 7 हजार 425 पथकांची आवश्यकता आहे. त्यापैकी 6 हजार 721 पथके नेमण्यात आली आहेत. दररोज 2 लाख 17 हजार 594 कुटूंबाना भेटी दिल्या जातात. 

आज अखेर 10 लाख 64 हजार 143 कुटूंबाना भेटी दिल्या आहेत. भेटी दरम्यान 1 हजार 403 तापाचे रूग्ण आढळले तर 38 हजार 658 कोरोना सदृश्य आढळून आले आहेत. 
कोकणात 6 हजार 420 ऑक्सिमिटर उपलब्ध आहेत. 6 हजार 602 थर्मल स्कॅनर उपलब्ध आहेत. त्यांनी नागरिकांचे सर्व्हेक्षण केले जात आहे.

कोकण विभागात माझे कुटूंब माझी जबाबदारी ही मोहीम गाव पातळीवर राबवण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, कोरोनाच्या उच्चाटनासाठी या योजनेचा निश्‍चित लाभ होईल, असा विश्‍वास मुख्यमंत्री उद्धव टाकरे यांनी वक्त केला. तसेच वैद्यकीय अधिकार्‍यांनी उपचार करताना करताना काही अडचण आल्यास टास्क फोर्सशी सल्लामसलत करावी. या मोहिमेत ग्राममपंचायत पातळीवर अधिक लोक सहभागी होतील याकडे लक्ष द्यावे. योजनेच्या प्रचार प्रसिद्धीसाठी विशेष प्रयत्न करावे असेही आवाहन ठाकरे यांनी केले आहे. 

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com