Jaiprakash Ramanand : वैद्यकीय महाविद्यालयास मिळाली हक्काची जागा : अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद

राष्ट्रीय आयुर्विज्ञान परिषदेच्या मानांकानुसार येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा कॅम्पस आता हक्काच्या जागेत उभारला जाणार आहे. एमआयडीसीच्या जागेत चंपक मैदानातील २० एकर जागा वैद्यकीय महाविद्यालयाला वर्ग केली.
Dean Dr. Ramanand announces medical college has received official land for its permanent campus.
Dean Dr. Ramanand announces medical college has received official land for its permanent campus.Sakal
Updated on

रत्नागिरी : राष्ट्रीय आयुर्विज्ञान परिषदेच्या मानांकानुसार येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा कॅम्पस आता हक्काच्या जागेत उभारला जाणार आहे. एमआयडीसीच्या जागेत चंपक मैदानातील २० एकर जागा नुकतीच वैद्यकीय महाविद्यालयाला वर्ग केली. एमआयडीसीने नाममात्र भाडेतत्त्वावर ९९ वर्षांच्या कराराने ही जागा दिली आहे. या २० एकरांवर महाविद्यालयाचा आधुनिक कॅम्पस उभारण्यासाठी ५९५ कोटींचा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे पाठवला आहे. पालकमंत्री उदय सामंत यांच्या विशेष प्रयत्नामुळे हे शक्य झाले, अशी माहिती वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता (डीन) डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी दिली.

Dean Dr. Ramanand announces medical college has received official land for its permanent campus.
Solapur: सोलापूर ‘आरटीओ’तील नऊ निरीक्षकांच्या बदल्या; गृह विभागाचे आदेश; सोलापूरला मिळाले सात वाहतूक निरीक्षक

रत्नागिरी वैद्यकीय महाविद्यालय सध्या महिला रुग्णालयाच्या इमारतीमध्ये आहे. पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रयत्नानंतर रत्नागिरीकरांची ४० वर्षांपूर्वीची मागणी पूर्ण झाली होती. कोट्यवधी रुपये खर्च करून रुग्णालयाच्या इमारतीमध्ये सुधारणा केली. कार्पोरेट ऑफिसपेक्षाही देखणी आणि वातानुकूलित वैद्यकीय महाविद्यालय या इमारतीमध्ये सुरू झाले; परंतु ही तात्पुरती पर्यायी व्यवस्था होती.

महाविद्यालयाच्या कॅम्पससाठी स्वतंत्र आणि हक्काच्या जागेचा शोध सुरू होता. कापडगावामध्ये यापूर्वी जागेबाबत पाहणी झाली होती; परंतु ते रत्नागिरीपासून लांब पडत असल्याने त्याचा विचार झाला नाही. अखेर उदय सामंत दुसऱ्यांदा उद्योगमंत्री झाले आणि स्टरलाईटची सुमारे साडेपाचशे ते सहाशे एकर जागा एमआयडीसीच्या ताब्यात आली. वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीसह इतर कॅम्पससाठी ५९५ कोटींचा प्रस्ताव यापूर्वी वैद्यकीय शिक्षण विभागाला पाठवला होता. मंत्री हसन मुश्रीफ यांनी यासाठी हक्काची जागा असेल तर निधी मंजूर करता येईल, असे सांगितले होते. जागा नसल्यामुळे हा प्रस्ताव थांबला होता.

उदय सामंत यांनी उद्योगमंत्री म्हणून रत्नागिरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी एमआयडीसीची चंपक मैदान येथील २० एकर जागा दिली असून, ती वैद्यकीय महाविद्यालयाला वर्गही केली. त्या जागेवर संरक्षक भिंत उभारली आहे. या जागेमध्ये आता मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल, विद्यार्थी वसतिगृह, मुलींचे वसतिगृह, नर्सिंग कॉलेज, कर्मचारी वसाहत, वैद्यकीय अधिकाऱ्यांचे बंगले आदी उभारण्यात येणार आहेत. वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी याबाबत चर्चा झाली असून, सार्वजनिक बांधकाम विभागाशी चर्चा करून सुधारित प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे. त्यामुळे या प्रस्तावामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

मोक्याच्या ठिकाणी महाविद्यालयाला जागा
रत्नागिरी वैद्यकीय महाविद्यालयाला अतिशय मोक्याच्या ठिकाणी जागा मिळाली आहे. महाविद्यालयापासून काही अंतरावरच मिऱ्या-नागपूर हा महामार्ग गेला आहे. शहरापासून जवळ असले तरी वर्दळ कमी आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांचा फायदा मिळेल, असेही डॉ. रामानंद यांनी सांगितले.

Dean Dr. Ramanand announces medical college has received official land for its permanent campus.
Eye Donation: 'मरणोत्तर नेत्रदानाने दोघांना मिळणार दृष्टी'; जाधव कुटुंबीयांचा पुढाकार, दृष्टिहीनांना मिळाली नवीदृष्टी

अर्थसाह्य करणाऱ्या संस्थांकडून सर्व्हे
जिका (जेजेसीए) आणि एशियन बॅंकेकडून या प्रकल्पासाठी अर्थसाहाय्य मिळणार आहे. या संस्थांकडूनही जागेचा दोनवेळा सर्व्हे झाला आहे. बुधवारी (ता. २१) पुन्हा जिकाचे काही आर्किटेक्चर येऊन जागेचा फेरसर्व्हे करणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com