esakal | ''बकरी ईद व गणेशोत्सव सण साजरे करा पण शासनादेश पाळा" 
sakal

बोलून बातमी शोधा

meeting of the Peace Committee under the chairmanship of District Collector Laxminarayan Mishra to maintain law and order

गणेशोत्सवासाठी मोठ्या प्रमाणावर चाकरमानी गावाकडे येत असतात.

''बकरी ईद व गणेशोत्सव सण साजरे करा पण शासनादेश पाळा" 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर येणारे सण साजरे करीत असताना शासनाकडून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे सर्व नागरिकांनी काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी केले. 
आगामी काळात येणाऱ्या बकरी ईद व गणेशोत्सवाच्या सणांमध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहणाच्या अनुषंगाने शांतता समितीची बैठक काल (. 30) जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली अल्पबचत सभागृह झाली. या वेळी ते बोलत होते.

जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अप्पर पोलिस अधीक्षक विशाल गायकवाड, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे, प्रांताधिकारी विकास सूर्यवंशी आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी मिश्रा म्हणाले, गणेशोत्सवासाठी मोठ्या प्रमाणावर चाकरमानी गावाकडे येत असतात. त्यामुळे चाकरमानी व स्थानिक ग्रामस्थ यांच्यामधील मतभेद टाळण्यासाठी नागरी कृतिदल, ग्राम कृतिदल यांच्या स्थानिक स्तरावर बैठका घेऊन मार्गदर्शन करण्यात येईल. तसेच येणाऱ्या चाकरमान्यांनी शासनाकडून दिलेल्या सूचनांचे पालन करून सण साजरा करावा.

हेही वाचा- ....स्वतःचा निकाल पाहण्याआधीच अनुष्काची चटका लावणारी एक्झीट... -

सद्यपरिस्थितीमध्ये नर्स व डॉक्‍टर्स यांनी पुढाकार घेऊन कोरोनासंदर्भात कामासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी मिश्रा यांनी केले. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मुंढे यांनीही मार्गदर्शन केले. बैठकीमध्ये समिती सदस्य, विविध सामाजिक संस्थेचे प्रतिनिधी यांनी सण साजरे करताना निर्माण होणाऱ्या अडचणींबाबत चर्चा केली. या वेळी समिती सदस्यांनी शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार सण साजरे करु, असे आश्वासित केले. 

हेही वाचा- ऑनलाईन जाहिराती पाहताय तर ही बातमी वाचाच... - ​

कोव्हिड केअर सेंटरमध्ये बेड वाढवणार 
कोरोनाच्या अनुषंगाने आरोग्य विभाग चांगले काम करीत आहे. या विभागातील मनुष्यबळ वाढविण्यासाठी सफाई कर्मचारी व नर्स यांची मानधनावर भरती प्रक्रिया सुरू आहे. खासगी रुग्णालयांना ऍन्टिजेन टेस्ट कीट पुरविले आहेत. महिलांसाठी स्वतंत्र रुग्णालय सुरू होत आहे. कोव्हिड केअर सेंटरमध्ये बेडची क्षमता वाढविण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. 

संपादन - अर्चना बनगे

loading image