esakal | राष्ट्रवादी सेनेला धडा शिकवणार? चिपळुणात सभापती, उपसभापती निवड

बोलून बातमी शोधा

meeting today for encumbrous in chiplun desicon take of encumbrous elected}

दरम्यान, विद्यमान सभापती, उपसभापतींनी अद्याप राजीनामा दिलेला नाही.

राष्ट्रवादी सेनेला धडा शिकवणार? चिपळुणात सभापती, उपसभापती निवड
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

चिपळूण (रत्नागिरी) : चिपळूण पंचायत समितीच्या सभापती, उपसभापतिपदाची मुदत संपल्याने नव्या पदाधिकाऱ्यांची निवडीसंदर्भात आज रविवारी महाविकास आघाडीची बैठक होणार आहे. तालुक्‍यात महाविकास आघाडी असताना कादवडमध्ये सरपंच निवडीवेळी ग्रामपंचायत स्तरावर सत्तेच्या राजकारणासाठी शिवसेनेकडून झालेली फोडाफोडी राष्ट्रवादीच्या जिव्हारी लागली आहे. याचा परिणाम या निर्णयावर होण्याची शक्‍यता आहे. 

दरम्यान, विद्यमान सभापती, उपसभापतींनी अद्याप राजीनामा दिलेला नाही. त्यामुळे सभापती पदासाठी धनश्री शिंदे यांना पुढे मुदतवाढ देणार की फेरबदल करणार, याकडे तालुक्‍याचे लक्ष लागलेले आहे. येथील पंचायत समितीत सुरवातीच्या अडीच वर्षाचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सभापती पदासाठी सव्वा-सव्वा वर्षाचा कालावधी ठरला होता. त्यानुसार सभापतीपदाची पहिली संधी शिवसनेच्या रूपाने धनश्री शिंदे यांना मिळाली तर उपसभापतीपदी राष्ट्रवादीचे पाडुरंग माळी यांची वर्णी लागली. 

हेही वाचा - पूजा चव्हाण प्रकरणावरून दीवार आठवला; नितेश राणेंचा शिवसेनेवर घणाघात -

ठरलेल्या धोरणाप्रमाणे या वेळी राष्ट्रवादीला सभापतिपद मिळणार आहे. राष्ट्रवादीतही सभापतिपद नेमके द्यायचे तरी कोणाला, यावरून खल सुरू आहे. शिवसेनेकडून उपसभापती पदासाठी गटनेते राकेश शिंदे, सुनील तटकरे, प्रतापराव शिंदे इच्छुक आहेत. यातील कोणाची वर्णी लागते, याकडेही कार्यकर्त्यांचे लक्ष लागलेले आहे. 
 

समीक्षा घडशीदेखील इच्छुक

सव्वा वर्षापूर्वी राष्ट्रवादीकडून कापसाळ गणाच्या सदस्या रिया कांबळी यांना सभापतीपद देण्याचा शब्द दिला होता. रिया कांबळीसह कोकरे गणाच्या समीक्षा घडशी या देखील सभापती पदासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीच्या बैठकीत प्रामुख्याने राष्ट्रवादीचे पदाधिकारी नेमकी कोणती भूमिका घेतात, याकडे शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे लक्ष आहे.

विद्यमानांनाच पुढे चाल..

दरम्यान, नव्या निवडीपूर्वी विद्यमान सभापती, उपसभापतींनी संबंधितांकडे राजीनामा देणे आवश्‍यक होते; मात्र तो देण्यात आलेला नाही. त्यामुळे विद्यमान पदाधिकाऱ्यांनाच पुढे चाल दिली जाणार असल्याची चर्चा आहे.

हेही वाचा -  सर्वसामान्यांना आता फोडणीही झोंबणार ; खाद्यतेलाचे दरही चढेच राहणार -

फोडाफोडी राष्ट्रवादीच्या जिव्हारी 

कादवडमध्ये सरपंच निवडीपूर्वी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांना फूस लावली. सेनेत आलेल्या दोन्ही सदस्यांना सरपंच व उपसरपंच दिले. तालुक्‍यात महाविकास आघाडी असताना ग्रामपंचायत स्तरावर सत्तेच्या राजकारणासाठी शिवसेनेकडून झालेली फोडाफोडी राष्ट्रवादीच्या जिव्हारी लागली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतील काही सदस्य आणि पदाधिकारी हे विद्यमान सभापती, उपसभापतीमध्ये बदल करण्यास राजी नाहीत.