
Indapur midnight fire: Three shops gutted, blaze controlled by firefighters at dawn.
Sakal
-अमित गवळे
पाली : माणगाव तालुक्यातील इंदापूर येथे शुक्रवारी (ता. 5) मध्यरात्री एकच्या सुमारास एका इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या तीन दुकानांना (कटलरी, मेडिकल व स्वीट मार्ट) अचानक आग लागली. शनिवारी (ता. 6) पहाटे पावणे पाच वाजता या भीषण आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.