तिलारी क्षेत्रात भूकंपाच्या सौम्य धक्क्यांची नोंद | kokan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Earthquake

तिलारी क्षेत्रात भूकंपाच्या सौम्य धक्क्यांची नोंद

ओरोस : तिलारी भूकंप क्षेत्रात मध्यरात्री ३.२ रिष्टर स्केल भूकंपाच्या धक्क्याची नोंद झाली आहे. रात्री २ वाजून ३४ मिनिटांची हा धक्का बसल्याची तिलारी भूकंप वेधशाळेने म्हटले आहे. नोंद झाली असलीतरी भूकंपाचे धक्के तिलारी क्षेत्रात जाणवलेले नाहीत, अशी माहिती तिलारी भूकंप वेधशाळा कोनाळकट्टाचे अधिकारी त्रंबे यांनी दिली.

हेही वाचा: नाशिक : बृहन्‍मुंबई पोलिस भरती परीक्षेला उमेदवारांचा प्रतिसाद

रविवारी मध्यरात्री राज्यातील काही भागांत भूकंपाचे धक्के जाणवले. कोकण पट्ट्यातील देवरुख भागात सुद्धा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. त्याप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग येथील आंतरराज्य असलेल्या तिलारी धरण क्षेत्रात सुद्धा भूकंप झाल्याची नोंद झाली आहे. याची तीव्रता ३.२ रिष्टर स्केल एवढा कमी असल्याने तो तिलारी क्षेत्रात जाणवला नाही. याबाबत तिलारी भूकंप वेधशाळा कोनाळकट्टाचे अधिकारी त्रंबे यांना विचारले असता, भूकंपाचा धक्का बसल्याची नोंद झाली आहे. मात्र, भूकंपाचे धक्के जाणवले नाहीत, असे सांगितले.

चांदोली धरण व परिसरात ३.२ रिश्टर स्केलचा सौम्य भूकंपाचा धक्का जाणवला असल्याची माहिती वारणा पाटबंधारे विभाग वारणा चे शाखाधिकारी टी. एस.धामणकर यांनी दिली. ते म्हणाले,भूकंपाचा हा धक्का वारणावती व चांदोली वारणा धरण परिसरात जाणवला आहे.याचा केंद्र बिंदू १८.२ किलोमीटरवर अंतरावर आहे. या भूकंपाच्या धक्क्याचे स्वरूप सौम्य स्वरूपात असल्याने परिसरात कोणतीही आर्थिक अथवा जिवितहानी झालेली नाही

loading image
go to top