मळगावात डंपर वाहतूक रोखली 

mining traffic stopped malgao konkan sindhudurg
mining traffic stopped malgao konkan sindhudurg

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - मळगाव येथे मायनिंग वाहतूक करणाऱ्या एका डंपर चालकाने तेथील मायनिंग डंपर सोडण्यासाठी रस्त्यावर नेमलेल्या एका सुरक्षा रक्षकाला शिविगाळ केल्याने संतप्त मळगाव ग्रामस्थांनी डंपर वाहतूक रोखली. अखेर त्या डंपर चालकाने घटनास्थळी येऊन माफी मागितल्यावर ग्रामस्थांनी डंपर वाहतूक पूर्ववत करण्यात आली. 

मळगाव येथे आज सकाळी मायनिंग वाहतूक करणाऱ्या एका डंपर चालकाने डंपर सोडण्यासाठी नेमलेल्या सुरक्षा रक्षकाला शिविगाळ करून धमकी दिली. ही बाब स्थानिकांना समजताच संतप्त ग्रामस्थांनी मळगाव-वेत्ये मार्गावरून होत असलेली डंपर वाहतूक रोखली. जोपर्यंत संबंधित व्यक्ती येऊन माफी मागत नाही, तोपर्यंत डंपर सोडणार नाही, असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला. यावेळी वातावरण तंग झालेले पाहून घटनास्थळी पोलिसांना पाचारण करण्यात आले.

यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक अण्णासो बाबर दाखल झाले. त्यांनी ग्रामस्थांना शांत करण्याचा प्रयत्न करून आपणास कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास पोलिस ठाण्यात रीतसर तक्रार द्या, असे सुचविले; मात्र ग्रामस्थ भूमिकेवर ठाम राहिले. अखेर त्या डंपर चालकाने तिथे येऊन त्या सुरक्षा रक्षकासह ग्रामस्थांची माफी मागीतली. त्यानंतर ग्रामस्थांनी डंपर वाहतूक सुरळीत केली; मात्र डंपर रोखल्यामुळे कोणतीही वाहतूक कोंडी झाली नव्हती. डंपर वाहतूक रोखल्यामुळे यावेळी मळगाव आणि वेत्ये मार्गावर लांबलचक डंपरची रांग लागली होती. त्यामुळे काहीसा वाहतुकीस अडथळा होत होता; मात्र परिस्थिती नियंत्रणात आल्यावर वाहतूक सुरळीत झाली. 

संपादन - राहुल पाटील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com