गृहराज्यमंत्री दीपक केसरकर बनले शेतकरी

अमोल टेंबकर
शनिवार, 30 जून 2018

सैन्य दलातील जवानांप्रमाणे राज्यातील शेतकऱ्यांचा गौरव केला जाईल. पीएफ व पेन्शन सारख्या योजनांचा त्यांना लाभ दिला जाईल. भविष्यात 'कृषी आर्मी' तयार करायचा आमचा मानस असून, त्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत. अशी घोषणा राज्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी होडावडा येथे आयोजित कार्यक्रमात केली. 

सावंतवाडी : सैन्य दलातील जवानांप्रमाणे राज्यातील शेतकऱ्यांचा गौरव केला जाईल. पीएफ व पेन्शन सारख्या योजनांचा त्यांना लाभ दिला जाईल. भविष्यात 'कृषी आर्मी' तयार करायचा आमचा मानस असून, त्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत. अशी घोषणा राज्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी होडावडा येथे आयोजित कार्यक्रमात केली. 

शेतीचे वार्षिक उत्पन्न वाढविण्यासाठी आधुनिक पद्धत स्वीकारणे गरजेचे आहे त्यासाठी चांदा ते बांदा या योजनेच्या माध्यमातून करोडो रूपये दिले आहेत. याचा फायदा येथील शेतकऱ्यांनी घ्यावा व आपले उत्पन्न दुप्पट-तिप्पट वाढवावे असेही केसरकर यांनी सांगितले. यावशी केसकर स्वतःहा शेतकरी झाले होते. त्यांनी ट्रॅक्टरच्या चालवून भाताची लावणीही केली. 

पालक मंत्री दीपक केसरकर यांच्या संकल्पनेतून चांदा ते बांदा या योजनेअंतर्गत तयार करण्यात आलेल्या श्री पद्धत लागवडीचा शुभारंभ केसरकर यांच्या हस्ते आज होडावडे येथे करण्यात आला. यावेळी पंचायत समिती सदस्य रवी मडगावकर नगराध्यक्ष बबन साळगावकर,  प्रकाश परब, रूपेश राऊळ, पंकज पेडणेकर, उत्तम पांढरे, कृषी विभागाचे प्रमोद सावंत आदी उपस्थित होते.

यावेळी केसरकर म्हणाले, चांदा ते बांदा या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी आधुनिक यंत्रसामुग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे. आत्ता भात लावण्यासाठी  वाकण्याची गरज नाही. त्यात आधुनिक पद्धती आल्या आहेत. त्याचा फायदा येथील शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आला आहे. भविष्यात येथील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट तिप्पट होईल. केरळ येथील कृषी तंत्रज्ञान येथे शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे प्रयत्न सुरू आहे. येणाऱ्या काळात गावागावात प्रशिक्षण दिले जाणार आहे
.

केरळ राज्याच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्रातील शेतकरी सबळ हवा यासाठी सैन्य दलातील जवानांना ज्याप्रमाणे पाठबळ दिले आहे. त्यांचा गौरव केला त्याच प्रमाणे शेतकऱ्यांना पीएफ पेंशन अपघात विमा आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याचा फायदा शेतकऱ्यांना नक्कीच होईल. सैनिक ज्याप्रमाणे देशाची सेवा करतात त्याच प्रमाणे पिक उत्पन्न करून देशाची गरज भागवण्याचे काम शेतकरी करतो हे सर्व त्यांचे काम लक्षात घेता प्रथमच राज्यात हा उपक्रम राबवला जाणार आहे. असेही केसकरांनी सांगितले.

Web Title: minister deepak kesarkar become farmer