यापुर्वीचे काही खासदार फक्‍त चित्रातच दिसायचे

यापुर्वीचे काही खासदार फक्‍त चित्रातच दिसायचे

देवगड - खासदार विनायक राऊत यांच्या कामाचा आवाका मोठा आहे. मतदारसंघातील प्रत्येक गावात त्यांचा सातत्याने संपर्क राहिला आहे. नाहीतर यापुर्वीचे काही खासदार फक्‍त चित्रातच दिसायचे, असा टोला नाव न घेता दीपक केसरकर यांनी लगावला.

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमधील मोंडतर -वीरवाडी -वाडातर
रस्त्याच्या कामाचे भुमिपुजन श्री. केसरकर यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.

विकासकामांची भुमिपुजने करण्यामध्ये आपल्याला हौस नाही; मात्र विकासकामे मंजूर आम्ही करायची, स्थानिकांची गरज ओळखून त्याला आम्ही निधी द्यायचा आणि त्याची भुमिपुजने करून आपणच कामे आणली असा विरोधक आभास निर्माण करतात. यासाठी अलिकडे आपण भुमिपुजनासाठी उपस्थित असतो. विकासाच्या गप्पा मारणारे यापुर्वी निधी आणू शकले नाहीत. 

-   दीपक केसरकर, पालकमंत्री

यावेळी माजी आमदार अजित गोगटे, शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख अरूण दुधवडकर, तालुकाप्रमुख मिलिंद साटम,  प्रसाद करंदीकर, उपसभापती संजय देवरूखकर, जिल्हा परिषद सदस्य गणेश राणे, प्रदीप नारकर, भाजप तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर, ऋतुजा तारी, सुधीर जोशी, कार्यकारी अभियंता के. डी. घाडगे, उपअभियंता पी. एस. माळगांवकर, कनिष्ठ अभियंता बी. एस. मोंडकर, बिपीन कोरगांवकर उपस्थित होते.

श्री. केसरकर म्हणाले, ""मागील कित्येक वर्षात आला नाही एवढा निधी युतीच्या काळात आला. जिल्ह्यातील विविध पालिकांना कोट्यवधीचा निधी दिला. बऱ्याच वर्षापासून रखडलेल्या रस्त्यांना मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला. पक्ष कोणताही असला तरी जनता आपली असल्याचे मानून मागणीप्रमाणे निधी उपलब्ध करून दिला. स्थानिक विकास झाला पाहिजे. निधीचा प्रामाणिकपणे विनियोग होऊन विकास जनतेपर्यंत पोचला पाहिजे. यातून दर्जेदार कामे झाली पाहिजेत. परंतु विरोधकांचे काहीही योगदान नसताना आपणच निधी आणल्याच्या अविर्भावात भुमिपुजने केली जातात.''

पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान झाले पाहिजेत. त्यासाठी हिंदूत्वाच्या मुद्यावर युती भक्‍कम झाली असून राज्यातील सर्व खासदार युतीचे निवडून येण्यासाठी कार्यकर्त्यांचे प्रयत्न आहेत. 

-  अरूण दुधवडकर

श्री. गोगटे यांनी, युती शासनाने विकासाचा झपाटा लावल्याचे सांगुन खाडीकिनारी पथदीप लावण्याचे सुचवले. सुत्रसंचालन करून आभार हृदयनाथ तारी यांनी मानले.

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com