कोकण रेल्वे प्रवाशांचे प्रश्न सोडवा, अन्यथा आंदोलन - केसरकर

कोकण रेल्वे प्रवाशांचे प्रश्न सोडवा, अन्यथा आंदोलन - केसरकर

सावंतवाडी - कोकण रेल्वे प्रवाशांचे प्रश्न सोडविण्यासाठी तात्काळ निर्णय घ्या. लोकांच्या मागण्या पूर्ण करा. अन्यथा तुमच्या विरोधात आंदोलन छेडून मला त्या आंदोलनाचे नेतृत्व करावे लागेल, असा कडक शब्दात इशारा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे कोकण रेल्वेचे एमडी संजय गुप्ता यांना दूरध्वनीद्वारे दिला.

याबाबत नियोजन करण्यासाठी २६ तारखेला पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या कार्यालयात बैठक घेऊन पुढील भूमिका ठरवण्यात येण्याचा निर्णय घेण्यात आला त्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.

श्री केसरकर यांनी आज येथे मळगाव- सावंतवाडी रोड येथे आयोजित करण्यात आलेल्या लाक्षणिक उपोषण स्थळी भेट दिली. यावेळी उपोषणकर्त्यांनी आपल्या मागण्या मांडल्या. कोकण रेल्वेची मुजोरी स्पष्ट केली. यावर श्री केसरकर यांनी दूरध्वनीद्वारे गुप्ता यांचे संपर्क साधला.

प्रवाशांच्या मागण्या रास्त आहेत या ठिकाणी गाड्या थांबणे गरजेचे आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात तात्काळ रेल्वे संदर्भातील प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करा अन्यथा तुमच्या विरोधात आम्हाला आंदोलन करावे लागेल असा इशारा यावेळी श्री. केसरकर यांनी दिला. 

आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास कधीही व प्रशासनाला सूचना न देता रेल्वे रोखू असा इशारा प्रवासी संघटनेचे अध्यक्ष डी. के. सावंत यांनी दिला आहे. यावेळी माजी आमदार राजन तेली, नगराध्यक्ष बबन साळगावकर, माजी जिल्हा परिषद रेश्मा सावंत, अक्रम खान,नगरसेवक बाबू कुडतरकर, अफरोज राजगुरू, नकुल पार्सेकर, प्रमोद गावडे,संजय तानावडे,राजू कासकर, इफ्तिकार राजगुर,जिल्हा परिषद सदस्य  उत्तम पांढरे, गणेशप्रसाद पेडणेकर,कल्पना बांदेकर, बाळा जाधव, अन्वर खान ,राजू परब, चंद्रकांत गावडे,नागेश गावडे, अजय तानावडे ,संजू कानसे ,संदीप आंगचेकर,भाई देऊलकर,अशोक देसाई, विनोद रेडकर,आर.डी. बांदेकर, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com