esakal | पणदेरी धरणाला गळती; अधिवेशनानंतर मंत्र्यांची थेट धरणाकडे धाव
sakal

बोलून बातमी शोधा

पणदेरी धरणाला गळती; अधिवेशनानंतर मंत्र्यांची थेट धरणाकडे धाव

पणदेरी धरणाला गळती; अधिवेशनानंतर मंत्र्यांची थेट धरणाकडे धाव

sakal_logo
By
सचिन माळी -सकाळ वृत्तसेवा

मंडणगड (रत्नागिरी) : तालुक्यातील पणदेरी धरण (Panderi Dam)गळतीमुळे धोकादायक झाल्याचे वृत्त समजताच कोकणातील मंत्री, आमदार, खासदार व लोकप्रतिनिधी यांनी पणदेरी धरणाकडे धाव घेत घटनास्थळी भेट दिली. पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांकडे घटनेचा आढावा घेत मार्गदर्शक सूचना केल्या. यामुळे दुर्लक्षित तालुक्याकडे आपत्तीकाळात केलेल्या दौऱ्याबद्दल तालुकावासीय समाधान व्यक्त करीत आहेत. खासदार विनायक राऊत, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, आमदार योगेश कदम, राजन साळवी यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी पणदेरी येथे घटनास्थळी दोन दिवसांत भेटी दिल्या.

मंत्री उदय सामंत म्हणाले, ‘‘सदर धरणाच्या गळतीची माहिती तत्काळ मिळाली. मुंबईत पावसाळी अधिवेशन चालू असल्यामुळे अधिवेशनात होतो. येथील स्थानिक आमदार योगेश कदम यांनी त्वरित जलसंपदा मंत्री जयंत पाटील व राज्यमंत्री बच्चू कडू यांची भेट घेतली. धरणाबाबत माहिती देत ताबडतोब प्रशानास सूचना केली. धरणांतर्गत येणाऱ्या वाड्यांचे स्थलांतर करण्याचे आदेश दिले. तसेच त्या धरणाचे पाणी जेवढे शक्य होईल तेवढे कमी करून धरण रिकामे कसे करता येईल याचे नियोजन करण्यास सांगितले.

हेही वाचा- रत्नागिरी उद्योगनगरी होण्यासाठी मंत्री नारायण राणे यांनी निर्णय घ्यावा; अ‍ॅड. पटवर्धन, भाजप कार्यकर्त्यांनी केला जल्लोष

आमदार योगेश कदम यांनी तातडीने घटनास्थळी पोहचून जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्यासमवेत परिस्थितीचा आढावा घेत दिवसभर थांबून धोका पूर्ण टळेपर्यंत लक्ष दिले.

आमदार कदम यांच्याकडून वस्तूंचे वाटप

स्थलांतर केलेल्या कुटुंबाना आमदार योगेश कदम यांच्याकडून जीवनावश्यक वस्तू व ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले. या वेळी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, प्रांताधिकारी शरद पवार, तहसीलदार नारायण वेंगुर्लेकर, कृषी पशुसंवर्धन सभापती रेश्मा झगडे, शिवसेना तालुकाप्रमुख प्रताप घोसाळकर, सभापती स्नेहल सकपाळ, उपसभापती प्रणाली चिले उपस्थित होते.

loading image