''रत्नागिरी उद्योगनगरी होण्यासाठी राणे यांनी निर्णय घ्यावा''

''रत्नागिरी उद्योगनगरी होण्यासाठी राणे यांनी निर्णय घ्यावा''

रत्नागिरी : रत्नागिरी हापूस आणि मोसमी फळे मच्छी, पर्यटन या क्षेत्राबाहेर जात लघू, मध्यम उद्योग रत्नागिरीमध्ये सुरू व्हावेत. स्थानिक युवकांना उत्तम संधी उपलब्ध व्हाव्यात आणि मंत्री नारायण राणे (narayan rane) यांनी रत्नागिरी ही लघु मध्यम उद्योगाची नगरी व्हावी यासाठी निर्णय घेत अंमलबजावणी करावी, असे प्रतिपादन द. रत्नागिरी भाजप जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन (deepak patwardhan)यांनी आज येथे केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आत्मनिर्भर भारत संकल्पना साध्य होत असताना राणे यांची मंत्रीपदी केलेली नियुक्ती औचित्यपूर्ण ठरेल, असेही अ‍ॅड. दीपक पटवर्धन म्हणाले. राणे यांनी नवी दिल्ली येथे सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री म्हणून शपथ घेतली. रत्नागिरीमध्येही भाजप कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. त्या वेळी अ‍ॅड. पटवर्धन बोलत होते. (ratnagiri-bjp-president-adv-deepak-patwardhan-speech-on-cabinet-expansion-2021-narayan-rane-kokan-news)

अ‍ॅड. पटवर्धन म्हणाले की, रत्नागिरीतील एमआयडीसी पाहिली तर बहुतांशी बंद पडलेली युनिट, नव्याने येऊ घातलेल्या एमआयडीसीला राजकीय मतलबातून होत असलेला विरोध यामुळे सर्वत्र नैराश्याचे वातावरण आहे. युवकांमध्ये असंतोष व नैराश्य आहे. अशा विपरीत परिस्थितीत राणे यांना सूक्ष्म लघू व मध्यम उद्योग मंत्रालय प्राप्त होणे हे उषःकालाचा अनुभव देणारे ठरेल. रत्नागिरीच्या औद्योगिक वसाहतीचा उपयोग खर्‍या अर्थाने उद्योगांसाठी व्हावा, सूक्ष्म उद्योग लघू व मध्यम उद्योगांना चालना मिळेल, योग्य सुविधा प्राप्त होतील, त्यासाठी केंद्र शासनाच्या योजनांचा थेट लाभ उद्योजकांना मिळेल. याकरिता राणे नक्की आग्रही राहतील. निर्णय घेतील, सूक्ष्म उद्योगांचे जाळे निर्माण करत येथील महिलावर्ग, सेमी स्किल्ड युवक युवती यांना सूक्ष्म उद्योगांसाठी चालना देऊन केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ सूक्ष्म उद्योगांसाठी प्राप्त करून देणे, प्रोत्साहित करणे, खूप महत्वाचे ठरेल.

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे स्वरूप पालटणार्‍या नारायण राणे यांच्याकडून रत्नागिरीतील युवक स्वाभाविक अपेक्षा ठेवून आहेत. लोकनेता ही बिरुदावली सातत्याने सांभाळणारे राणे रत्नागिरीतील युवकांच्या आशा-आकांक्षा फलद्रुप होतील, असे वातावरण निर्माण करतील, असा विश्वास वाटतो. राणे केंद्रात मंत्री झाल्याने रत्नागिरी भाजपा कार्यकर्त्यांना राजाश्रय प्राप्त झाला आहे. रत्नागिरी ते दिल्ली हे अंतर राणे साहेबांच्या मंत्रिमंडळात जाण्याने आता दूर राहिलेले नाही, असेही अ‍ॅड. पटवर्धन म्हणाले.

बचतगटाची चळवळ चांगले यश मिळवत असताना सूक्ष्म उद्योग सुरू करण्यासाठी त्यांना चालना दिली तर सूक्ष्म उद्योगाचे जाळे निर्माण करता येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत संकल्प साध्य करण्यासाठी मध्यम उद्योग श्रेणीची व्याख्या व्यापक केली आहे. अनेक आर्थिक योजना मध्यम उद्योजकांसाठी घोषित केल्या आहेत. या सर्व योजनेची अंमलबजावणी करत रत्नागिरीत लघू मध्यम उद्योगाचे जाळे निर्माण करण्याचे काम राणे नक्की करतील, असा विश्वास आहे.

भाजपला नवसंजीवनी

अनेक वर्षांनंतर केंद्रात महत्त्वाचे सत्ता पद प्राप्त झाले आणि त्यामुळे संपूर्ण कोकणात कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला. आनंदाला पारावार राहिला नाही. भाजपा संघटनेला नवसंजीवनी प्राप्त होणार आहे हे आता निश्चित झाले. राणे यांच्या मंत्रालयामुळे आत्मनिर्भर भारत संकल्पना राबविण्याचे धोरण महत्त्वाचे ठरणार आहे.कार्यभार स्वीकारतानाच लघू मध्यम उद्योगांचे जीडीपीमध्ये योगदानाचा प्रमुख मुद्दा, आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत किती प्रमाणात लघू, मध्यम उद्योग उभे राहिले, असे महत्वाचे प्रश्‍न उपस्थित करताना अधिकारी वर्गाला योग्य संदेश राणे यांनी दिल्याचे अ‍ॅड. पटवर्धन म्हणाले.

रत्नागिरी जिल्हा हा औद्योगिक विकासात मागे

राजकीय नेतृत्वाने न दाखविलेली दूरदृष्टी, सातत्याने शिवसेनेच्या पाठीशी राहिले लोकमत, कोकण विकासामध्ये अडसर ठरले. रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात सेनेला यश आले नाही. कोणताही उद्योग येणार म्हटले की विरोधाचा सूर लावून आपली पोळी भाजून घेतली. त्यामुळे औद्योगिकीकरणात जिल्हा शेवटच्या स्थानी आहे. उच्चशिक्षित होऊनही रोजगाराची संधी नाही, शेती परवडत नाही, मत्स्यव्यवसाय लहरी निसर्गावर व नवीन यांत्रिक नौकांच्या अतिक्रमणाने भरडला गेलेला उद्योग ठरला आहे. अशा विपन्नावस्थेत रत्नागिरी असताना राणे यांचे मंत्रालय रत्नागिरीसाठी महत्त्वाचे असल्याचे अ‍ॅड. पटवर्धन म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com