मला कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत जिल्हावासीयांच्या आशीर्वादाने मी ठणठणीत : उदय सामंत

राजेश कळंबटे
Monday, 27 July 2020

१४ दिवस सेल्फ क्वारंटाईन झालो आहे. आता १० दिवस झाले. तोवर

रत्नागिरी : सिंधुदुर्गात बैठक झाल्यानंतर आमचे सहकारी, आमदार वैभव नाईक यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. म्हणून मी १४ दिवस सेल्फ क्वारंटाईन झालो आहे. आता १० दिवस झाले. तोवर काही हितचिंतकांनी मला कोरोना झाल्याचे जाहीर केले; मात्र मला काही झालेलं नाही, कोणतीही लक्षणे नाहीत. जिल्हावासीयांच्या आशीर्वादाने मी ठणठणीत आहे, असे स्पष्टीकरण उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत 
यांनी दिले.

हेही वाचा- ...तर बळजबरीने जमिने घेण्याचा प्रयत्न हाणून पाडू! कुणी दिलाय इशारा? -

 ऑनलाइन झालेल्या आजच्या पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘गेल्या आठवड्यात माझा सिंधुदुर्ग दौरा झाला. तेव्हा वैभव नाईक यांच्यासह अनेक अधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित होते. त्यानंतर नाईक यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला तसेच माझ्या सिंधुदुर्गच्या पी.ए.चा अहवाल पॉझिटिव्ह आला. म्हणून मी १४ दिवस सेल्फ क्वारंटाईन होण्याचा निर्णय घेतला; मात्र काही झाले नसताना माझ्या काही हितचिंतकांनी मला कोरोना झाल्याचे जाहीर केले. मला कोणतीही लक्षणे नाहीत. पुढच्या आठवड्यात मी येणार आहे.’’  

हेही वाचा- मत्स्य विभागाकडून आदेश ; मच्छीमारी नौकांवर आता याची आहे नजर.... -

जिल्ह्यातील दिव्यांगांना मदत
‘निसर्ग’ चक्रीवादळ आणि कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर दिव्यांग व्यक्तींना आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सुमारे साडेसहा हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यांना जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाकडून ७७ लाख रुपये वाटप केले जातील. ‘निसर्ग’मध्ये २६९ लोकांना प्रत्येकी ४ हजार या प्रमाणे निधी दिला जाईल; तर कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर दापोली, मंडणगड ९१२, लांजा ४१३, गुहागर ४८१, रत्नागिरी ९०० यांना दोन हजार ५०० प्रमाणे मदत दिली जाईल. पहिल्या टप्प्यातील ही मदत आहे. दुसऱ्या टप्प्यात उर्वरित तालुक्‍याला मदत दिली जाईल, असे सामंत म्हणाले.

संपादन - अर्चना बनगे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Minister of Technical Education uday samant online press coneforence in ratnagir