रत्नागिरीतील व्हिक्‍टोरिया क्‍लबमधील दृश्‍याने मंत्री वायकर अवाक्‌

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

रत्नागिरी - पालिका इमारतीच्या परिसराची पाहणी करण्यासाठी सायंकाळी गेलेल्या पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्‍यासमोर पालिकेनजीकच्या क्‍लबमधील जे दृश्‍य आले, त्यामुळे ते अवाक्‌ झाले. विशेष म्हणजे, क्‍लबची ही इमारत पालिकेच्या मागे आहे. 

रत्नागिरी - पालिका इमारतीच्या परिसराची पाहणी करण्यासाठी सायंकाळी गेलेल्या पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्‍यासमोर पालिकेनजीकच्या क्‍लबमधील जे दृश्‍य आले, त्यामुळे ते अवाक्‌ झाले. विशेष म्हणजे, क्‍लबची ही इमारत पालिकेच्या मागे आहे. 

क्‍लबच्या नजीक आल्यावर पालकमंत्री अचानक आत शिरले. यावेळी त्यांच्यासोबत नगराध्यक्ष व शिवसेना नेते राजेंद्र महाडिकही होते. क्‍लबमध्ये गेल्यावर बाटल्या घेऊन काहीजण पेयपान करताना दिसले. त्यांना पालकमंत्र्यांनी हटकले.

तेथे जाण्यास त्यांना कोणी सुचवले की काय, ते कळले नाही. कारण येथील कथित गैरप्रकारांबाबत वारंवार चर्चा होते. पालकमंत्री आत गेल्यावर तेथे काहीजण बाटल्या उघडून बसलेले दिसले. आपल्याला येथे परवानगी आहे? असे वायकर यांनी विचारल्यावर त्यांना समाधानकारक उत्तर मिळाले नाही. नगराध्यक्षांनाही वायकर यांनी ‘हा काय प्रकार आहे’ असे छेडले. एकूण परिस्थितीवरून नगरपालिका पदाधिकारी आणि प्रशासनही हतबल असल्याचे दिसले. वायकर यांच्या या भेटीवेळी शिवसेनेचे पदाधिकारी, नगरसेवकही त्यांच्यासोबत होते. हे सारे या प्रकाराबाबत अनभिज्ञ होते की कसे याबाबत शहरात चर्चा रंगली. 

उत्तर न देता पोबारा
पेयपान व मौजमजा करणाऱ्यांनी पालकमंत्र्यांना समाधानकारक उत्तर न देता पोबारा केला. व्हिक्‍टोरिया क्‍लब हा पालिकेने नाममात्र शुल्कावर भाड्याने दिल्याची माहिती काहीजणांनी यावेळी सांगितली. यापूर्वी याबाबत नगरसेवक सुहेल मुकादम यांनी हा मुद्दा सभेत उपस्थित केला होता. तेव्हाच कारवाई झाली असती तर ही वेळ आली नसती.

Web Title: Minister Waikar Awak in view of the Victoria Club in Ratnagiri