Ratnagiri Gaur : वन्यजीव रस्त्यावर; मिरजोळे परिसरात गव्यांमुळे भीतीचे वातावरण
Gaur Sighting on Mirjole Road : रत्नागिरीजवळील मिरजोळे रस्त्यावर दोन गव्यांनी अचानक ठाण मांडल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. दीड तास हालचाल न करता उभ्या राहिलेल्या गव्यांमुळे वाहनचालक व ग्रामस्थांमध्ये भीती पसरली.
रत्नागिरी : शहराजवळील मिरजोळे हनुमाननगर, समर्थनगर येथील रस्त्यावर शनिवारी (ता. २०) रात्री दोन गव्यांचे दर्शन झाले. भररस्त्यावर येऊन उभ्या राहिलेल्या गव्यांमुळे मिरजोळे गावात जाणारी वाहने खोळंबली.