रत्नागिरीत मिशन बंधारे सक्सेस....

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 जानेवारी 2020

राजापूर तालुका; पंचायत समितीचा पुढाकार, टंचाईत मिळणार दिलासा, मुबलक पाणीसाठा.... 

राजापूर (रत्नागिरी) : तालुक्‍याला उन्हाळ्यामध्ये भासणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पंचायत समितीतर्फे लोकसहभागातून "मिशन बंधारे' अभियान राबविले जात आहे. यासाठी श्रमदान करण्यासाठी गावोगावच्या ग्रामस्थांचे हजारो हात पुढे सरसावले आहेत. विविध प्रकारचे 360 बंधारे बांधून झाले असून त्यामध्ये मुबलक पाणीसाठा झाला आहे. 

हेही वाचा- ब्लू व्हेल मासा का मरण पावतो.... वाचा

तालुक्‍याला दरवर्षी एप्रिल-मे महिन्यामध्ये पाणीटंचाईची झळ पोहचते. मुबलक प्रमाणात पडणारा पाऊस आणि त्यानंतर पाणीटंचाई दूर करण्यासाठी विविध नळपाणी योजनांच्या माध्यमातून शासनाकडून खर्च करण्यात येणारा लाखो रुपयांचा निधी असतानाही तालुक्‍याची पाणीटंचाईतून अद्यापही मुक्तता झालेली नाही. ही पाणीटंचाई दूर करण्यासाठी पंचायत समितीतर्फे दरवर्षी संभाव्य पाणीटंचाई आराखडा तयार करून पाणीटंचाईला सामोरे जाण्यासाठी नियोजन केले जाते. मात्र, हे नियोजनही फोल ठरते.

हेही वाचा- दुष्काळात पडणार आता या दुष्काळाची भर....

दहा बंधाऱ्यांचे नियोजन

या साऱ्या स्थितीवर मात करण्यासाठी पंचायत समितीने लोकसहभागातून ठिकठिकाणी बंधारे बांधण्याची मोहीम हाती घेतली आहे. यामध्ये सद्यस्थितीमध्ये 360 हून अधिक बंधारे बांधून झालेले आहेत. यामध्ये वनराई, कच्चे आणि विजय बंधाऱ्यांचा समावेश आहे. या बंधाऱ्यांमध्ये सध्या मुबलकप्रमाणात पाणीसाठा झाला आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीने दहा बंधारे बांधण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार तालुक्‍यामध्ये हजाराहून अधिक बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्याप्रमाणेत जलस्त्रोत असलेल्या तालुक्‍यातील विविध ठिकाणी सध्या ग्रामपंचायती लोकसहभागातून बंधारे बांधत आहे. 
 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mission Dam Success In Ratnagiri Kokan Marathi News