धमकी देणार्‍यांना म्हाडा अध्यक्ष सामंतांचे खुले आव्हान

धमकी देणार्‍यांना म्हाडा अध्यक्ष सामंतांचे खुले आव्हान

रत्नागिरी - कोणाच्याही दादागिरीला घाबरत नाही. माझा जन्म सिंधुदुर्गातला आहे, तर कर्मभूमी रत्नागिरीची आहे. कणकवलीच्या नाक्यावर येऊन उभे राहण्याची तयारी आहे. घरात घुसून मारहाण करण्याची धमकी देणार्‍यांना म्हाडा अध्यक्ष आमदार उदय सामंत यांनी खुले आव्हान दिले आहे. 

खंडाळा येथे शनिवारी (ता. 12) सायंकाळी शिवसेनेचा मेळावा झाला. डांबर घोटाळ्याचा आरोप करणार्‍यांनी या प्रकरणाची चौकशी लावावी. आपण त्यासाठी तयार आहोत. एप्रिलनंतर हेच डांबर आरोप करणार्‍यांना फासण्यासाठी राखून ठेवले आहे, असे प्रत्युत्तर सामंत यांनी नीलेश राणे यांना दिले. तसेच कोणीही कितीही आडवे आले तरी लोकसभा निवडणुकीत शिवसेनाच बाजी मारेल आणि खासदार विनायक राऊत मोठे मताधिक्य घेतील, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

ते म्हणाले की, खालच्या पातळीवर उतरून टीका करण्याची आमची संस्कृती नाही. मात्र वाट्टेल ते आरोप ऐकूनही घेतले जाणार नाहीत, असा इशारा आमदार सामंत यांनी दिला.

हा एकट्या वाटद परिसराचा मेळावा आहे. सहा ते सात हजार शिवसैनिक इथे जमले आहेत. हे भाड्याने आणलेले कार्यकर्ते नाहीत. कट्टर शिवसैनिक आहेत. तालुक्याचा मेळावा घेतला तर किती गर्दी होईल याची कल्पना करावी. मला पराभूत करण्यासाठी गतवेळी स्वतः मोदीही आले होते. तरीही इथल्या मतदारांनी मला चाळीस हजार मतांनी निवडून दिले.

उदय सामंतांवर टीका केली म्हणून तुम्हाला कोणी मते देणार नाहीत. आमची बांधिलकी जनतेशी आहे. ती जनता आमच्या पाठीशी आहे. वैयक्तिक पातळीवर टीका करण्यापेक्षा पराभूत का झालो याचे आत्मपरीक्षण करा, असा सल्ला त्यांनी दिला.

टीकाकारांना आधीच उत्तर

मेळाव्यात स्थानिकांचा टक्का किती हे सिद्ध करण्यासाठी आमदार सामंत यांनी उपस्थितांना हात वर करण्यास सांगितले. त्यांच्या सांगण्यावरून हजारो हात वर झाले. सभेला अन्य गावातील लोकांना आणून गर्दी केली असा आक्षेप कुणी घेऊ नये यासाठी आमदार सामंतांनी काळजी घेतली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com