आमदार संजय कदम यांना जामीन मंजूर

आमदार संजय कदम यांना जामीन मंजूर

रत्नागिरी - खेड येथे 2005 मध्ये तोडफोड आणि शासकीय कामात अडथळा केल्या प्रकरणी काल दापोलीचे आमदार संजय कदम आणि त्यांचे पाच साथीदार खेड पोलिसांना शरण आले होते. त्यांची रत्नागिरी येथे न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती. दरम्यान आज आमदार कदम यांना जामीन मंजूर झाला आहे. 

मुंबई उच्च न्यायालयाने 10 हजारांच्या जातमुचलक्यावर आमदार कदम यांचा जामीन मंजूर केला. खेड दिवाणी न्यायालयाचा निर्णय अतिरिक्त जिल्हा न्यायालयाने कायम ठेवला होता. एक वर्ष सश्रम कारावास आणि दंड अशी सुनावण्यात आली होती. 

जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयाने कदम आणि सहकाऱ्यांना एक वर्ष सश्रम करावासाची शिक्षा दिली होती. त्याविरूद्ध त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात जामीनासाठी विनंती अर्ज केला होता. 

दरम्यान काल आमदार संजय कदम स्वतःहून खेडच्या न्यायलयात पोलिसांना शरण गेले. या वेळी त्यांच्या बरोबर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य ना. बा. शेलार, पंचायत समितीच्या माजी सदस्य सुषमा विश्‍वास कदम, हरिश्‍चंद्र लक्ष्मण कडू, प्रकाश गोपाळराव मोरे, माजी उपसभापती विजय भिकाजी जाधव यांचा समावेश आहे.

हे सर्व शिवसेनेचे पदाधिकारी आहेत. या प्रकरणानंतर संजय कदम यांनी शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रसमध्ये प्रवेश केला होता. २००५ मध्ये खेड शहर आणि जवळच्या काही गावात पूर आल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाची तातडीची मदत देण्यात उशीर का होत आहे याची माहिती घेण्यासाठी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष या नात्यांने ते खेडच्या तहसीलदार कार्यालयात सहकाऱ्यांसह गेले होते. त्यावेळी तत्कालीन प्रांत अधिकारी डॉ.प्रवीण गेडाम यांच्या समोर मदत देण्यावरून माहिती घेतांना मोठा वाद झाला होता. यावेळी शासकीय कामात अडथळा आणल्याचा ठपका संजय कदमांसह अन्य पाच जणांवर ठेवण्यात आला होता.जिल्हा न्यायालयाने एक वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली होती. व त्यानंतर अतिरिक्त सत्र न्यायालयाने देखिल तीच शिक्षा कायम ठेवली होती. त्याविरुद्ध जामिनासाठी त्यांनी अर्ज केला होता तो अर्ज न्यायालयाने फेटाळल्याने पुढील कारवाई पोलिसांना करावी लागली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com