राणेंच्या भाजप प्रवेशावर वैभव नाईक म्हणाले,....

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 सप्टेंबर 2019

मालवण - खासदार नारायण राणे स्वतःच्या मुलांचे राजकिय अस्तित्व टिकवण्यासाठीच भाजपमध्ये प्रवेश करत आहेत, अशी टीका आमदार वैभव नाईक यांनी केली आहे.

मालवण - खासदार नारायण राणे स्वतःच्या मुलांचे राजकिय अस्तित्व टिकवण्यासाठीच भाजपमध्ये प्रवेश करत आहेत, अशी टीका आमदार वैभव नाईक यांनी केली आहे.

गेल्या काही महिन्यापासून खासदार नारायण राणे यांचा भाजप प्रवेश यासंदर्भात तारखांवर तारखा दिल्या जात होत्या. मात्र आता दोन आॅक्टोंबरला त्यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला आहे. या प्रवेशासंदर्भात आमदार नाईक यांना विचारले असता त्यांनी हे उत्तर दिले. 

आमदार नाईक म्हणाले, भाजप पक्ष किंवा युती टिकवण्यासाठी राणे भाजपमध्ये जात नसून हा प्रवेश आपल्या मुलांचे राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठीच आहे. 

नितेश राणे भाजपकडून लढणार यावर बोलताना श्री नाईक म्हणाले, कणकवली विधानसभा मतदारसंघात भाजपकडून नितेश राणे हे उमेदवार असतील, मात्र नितेश यांना शिवसेना फार मदत करेल असं वाटत नाही. त्यामुळे या संदर्भातला निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच घेतील.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Vaibhav Naik comment on Narayan Rane BJP Entry