महावितरणकडून बील वसुलीसाठी मोबाईलवर कॉल

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

चिपळूण - थकबाकीदार वीज ग्राहकांला त्याच्या मोबाईलवर थेट वीज बिलाचा भरणा करण्यासाठी मोबाईल कॉल सेवा विशेष वसुली मोहीम सुरू केली आहे. शहरभरात एकूण एक ग्राहकांचे मोबाईल नंबर गोळा करून त्यावर थकबाकीदार ग्राहकांना त्यांची बिले भरण्यासाठी कॉल केले जात आहेत.

चिपळूण - थकबाकीदार वीज ग्राहकांला त्याच्या मोबाईलवर थेट वीज बिलाचा भरणा करण्यासाठी मोबाईल कॉल सेवा विशेष वसुली मोहीम सुरू केली आहे. शहरभरात एकूण एक ग्राहकांचे मोबाईल नंबर गोळा करून त्यावर थकबाकीदार ग्राहकांना त्यांची बिले भरण्यासाठी कॉल केले जात आहेत. सध्या सुरू असलेल्या वसुली मोहिमेत अधिकाधिक वसुली व्हावी, यासाठी ही सेवा पहिल्यांदाच वापरात आली आहे.

महावितरणच्या यंत्रणेने विशेष वसुली मोहीम सध्या चिपळूण शहर व परिसरात सुरू केली आहे. अनेक वेळा ग्राहक त्यांची बिले वेळेवर भरत नाहीत. तेव्हा त्याचे मोबाईल नंबरचे संकलन केले आहे. सर्व कर्मचाऱ्यांनी मिळून जवळपास नव्वद टक्के ग्राहकांच्या संपर्क क्रमांकाची यादी तयार केली आहे. 

दृष्टिक्षेपात

  •  घरगुती व वाणिज्य ग्राहक - १९ हजार ७३७
  •  थकबाकी - तीन कोटी बारा लाख रुपये
  •  कृषी पंप ग्राहक - ११८३ 
  •  थकबाकी - ११ लाख २८ हजार रुपये
  •  इतर ग्राहक - ७०४ 
  •  थकबाकी - ६३ लाख ४६ हजार रुपये

या यादीवरून महावितरणच्या कार्यालयातून बिल थकीत झाल्यास किंवा वेळेवर बिल न भरल्यास मोबाईलवर कॉल करून बिल ताबडतोब भरणे, बिल भरण्याच्या अडचणी सोडवणे किंवा बिल भरणा केंद्राची नजीकची सोय अशी माहिती देणे शक्‍य होत आहे. तसेच थेट मोबाईल कॉलमुळे बिल भरणाकामी आवश्‍यक ती मदत देखील दिली जात आहेत. वसुली मोहिमेत पहिल्यांदाच ही सेवा उपयोगात आणली जात आहे. 

विशेष वसुली मोहिमेत ग्राहकांच्या मोबाईल क्रमांकावर त्यांची वीज बिल भरण्याबद्दल माहिती देणे सुरू केले आहे.
- प्रकाश जमधडे, 

कार्यकारी अभियंता, महावितरण

Web Title: Mobile call for collection of pending Electricity bill