

Mokhad Leopard AI Surveillance
Sakal
मोखाडा : मोखाडा तालुक्यातील वेगवेगळ्या भागात बिबट्याचा मोठ्या प्रमाणावर वावर वाढला आहे. बिबट्याने दुचाकीस्वारावर हल्ला केल्याची घटना देखील घडली आहे. त्यातच वेगवगळ्या भागात संध्याकाळ आणि रात्री बिबट्याचे अनेकांना दर्शन घडले आहे. त्यामुळे तालुक्यातील नागरीक भेदरले आहेत. बिबट्याची माहीती नागरीकांना व्हावी म्हणून वनविभागाने वारघडपाडा येथे AI तंत्रज्ञानाचे सौरऊर्जैवर चालणारा कॅमेरासह सायरन बसवला आहे. तसेच वेगवेगळ्या भागात वनकर्मचार्याचे गस्ती पथके निर्माण केली असून नागरीकांचे प्रबोधन करण्यात येत आहे.