
मोखाडा : पालघर जिल्ह्यात अवैधरित्या तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर मोखाडा पोलीसांनी गुटख्याच्या अवैध वाहतुकीवर मोठी धडक कारवाई करत सुमारे 4 लाख 84 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून एकाला अटक केली आहे.