जंगलातील माकडे अन्नासाठी गावात 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 डिसेंबर 2016

रसायनी - अन्नाच्या शोधात जंगलातील माकडे आता कारखान्यांत आणि गावांत येऊ लागली आहेत. कौलारू घरे असलेल्या नागरिकांनी या माकडांची चांगलीच धास्ती घेतली आहे. 

रसायनी - अन्नाच्या शोधात जंगलातील माकडे आता कारखान्यांत आणि गावांत येऊ लागली आहेत. कौलारू घरे असलेल्या नागरिकांनी या माकडांची चांगलीच धास्ती घेतली आहे. 

रसायनी परिसर, कर्नाळा किल्ला आणि पाताळगंगा परिसरातील गावांना घेरा माणिकगड किल्ल्याच्या डोंगररांगा लागून आहेत. जंगलात भेकर, रानडुक्कर, माकड, ससा, मुंगूस, घोरपड, मोर आदी प्राणी आढळतात. माकडे जंगलातून खाली उतरून कारखान्यांत आणि गावांत येत आहे. गावात शिरलेल्या माकडांना पाहून नागरिकांची चांगलीच तारांबळ उडत आहे. माकडांना पाहण्यासाठी मुले, बघ्यांची गर्दी होते. आवारातील फळझाडांवर तुटून पडणारी माकडे घराच्या कौलावर चढून नुकसान करतील, अशी भीती रहिवाशांना वाटते. 
वाढत्या कारखानदारीमुळे परिसरातील गावांची लोकसंख्या वाढली आहे. रहिवाशांकडून जंगलातील झाडांची कत्तल सुरू आहे. जंगलातील वेगवेगळ्या प्रकारची फळे व कंदमुळे गोळा करून आदिवासी शहरात विक्रीसाठी आणतात. या सर्व कारणांमुळे माकडांना अन्नाचा तुटवडा भासतो. ती आता अन्नाच्या शोधात नागरी वस्तीमध्ये येत असल्याचे पर्यावरणप्रेमींचे मत आहे.

Web Title: monkeys for food in the village

टॅग्स