esakal | मळगाव बाजारपेठेतील माॅर्डन बेकरी शाॅर्टसर्कीटने लागलेल्या आगीत जळून खाक
sakal

बोलून बातमी शोधा

मळगाव बाजारपेठेतील माॅर्डन बेकरी शाॅर्टसर्कीटने लागलेल्या आगीत जळून खाक

मळगाव बाजारपेठेतील माॅर्डन बेकरी शाॅर्टसर्कीटने लागलेल्या आगीत जळून खाक

sakal_logo
By
रुपेश हिराप

सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील मळगाव बाजारपेठेतील माॅर्डन बेकरी शाॅर्टसर्कीटने लागलेल्या आगीत जळून खाक झाली. ही घटना गुरुवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास घडली.सावंतवाडी नगरपालिका आणि कुडाळ एमआयडीसीचे बंब घटनास्थळी दाखल होऊनही त्यांचे प्रयत्न असफल ठरले. यात बेकरीचे सुमारे २५ लाख तर इमारतीचे २० लाख रुपये नुकसान झाले. यात रोख ४५ हजार रुपयेही जळून खाक झाले.

मळगाव बाजारपेठेपासुन पुढे काही अंतरावर दत्त मंदीर प्रवेशद्वारासमोर महेश खानोलकर यांच्या भाड्याच्या दुकानगाळ्यात सुजेश नायर यांची माॅर्डन बेकरी या नावाने बेकरी व्यवसाय गेल्या पाच वर्षापूर्वीच सुरु केला होता. बेकरीच्या पाठीमागच्या बाजुलाच लागुन ओव्हन व्दारे पाव तसेच इतर बेकरी प्रोजेक्ट तयार केले जात होते. नायर याने या व्यवसायात चांगला जम बसवला होता.गुरुवारी पहाटे बाहेर आवाज येत असल्याने नजिकच्या राहणार्यानी पाहीले असता बेकरीला आग लागल्याचे दिसुन आले. त्यांनी इतरांना कल्पना दिल्यानंतर यंत्रणा हलली.

हेही वाचा: अटलजींच्या भाषणाची क्लीप शेअर करत वरूण गांधींचा भाजपला घरचा आहेर

घटनास्थळी सावंतवाडी नगरपालिकेचा पंप तसेच कुडाळ एमआयडीसीचा बंब मागविण्यात आला. बंब येईपर्यंत स्थानिक ग्रामस्थांनी मदत कार्यात सहभागी होत. बेकरीचा मागचा दरवाजा उघडून सिलिडंरच्या टाक्या बाहेर काढल्या. मात्र आगीचा भडका प्रचंड असल्याने इतर काहीच हालचाली करता आल्या नाही. दोन्ही ठिकाणचे बंब दाखल झाल्यानंतर पाण्याच्या साहाय्याने आग वाजविण्यात आली अग्निशामक कर्मचार्यांनी समोरील सटर कटावणीच्या साहाय्याने उघडून आतमधे आग विझवली मात्र आतील सर्व सामान जळून पूर्णतः बेचिराख झाले होते.

आगीचा भडका मोठा असल्याने इमारतीसाठी तडे गेले आयसीसी इमारत असल्याने बाजुच्या अन्य दुकानाचे नुकसान टळले.

बेकरी मालक नायर याच्याकडून माहीती घेतली असता सुमारे २५ लाख रुपयाचे नुकसान झाल्याचे सांगितले तर दुकान गाळा मालक खानोलकर यांनी इमारती जवळपास २० लाख रुपये नुकसान झाले असुन पुर्ण इमारतीला तडे गेल्याचे सांगितले.

घटनास्थळीच सावंतवाडी तहसिलदार राजाराम म्हात्रे यांनी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली तसेच पोलिसांकडून घटनेचा पंचनामा करण्यात आला. मळगाव सरपंच स्नेहल जामदार उपसरपंच हनुमंत पेडणेकर ग्रामपंचायत सदस्य आना गावकर, गणेशप्रसाद पेडणेकर, आनंद देवळी, ग्रामपंचायत कर्मचारी वर्ग, महेश पंतवालावलकर,संजय नाटेकर,संतोष नार्वेकर, हेमंत खानोलकर ,उदय सावळ आदी मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी मदत कार्य सहभाग घेतला होता.

loading image
go to top