

Konkan Sugarcane Crisis Deepens: Farmers Face Uncertainty
Sakal
राजेंद्र बाईत, राजापूर
हवामानातील बदलासह अन्य विविध कारणांमुळे निर्माण होणार्या प्रतिकूल स्थितीचा भातशेतीवर परिणाम होताना दिसत आहे. त्यातून. भातशेतीचा उत्पन्न अन् खर्चाचा ताळमेळ बिघडत चालला असून आर्थिकदृष्ट्या भातशेती परवडत नसल्याचे सांगितले जात आहे. अशातच, कमी खर्चामध्ये चांगले उत्पन्न मिळवून देणारे पिक म्हणून ऊस लागवड शेतकर्यांसमोर नवा पर्याय निर्माण होत आहे. मात्र, गेल्या काही वर्षामध्ये सातत्याने हवामानामध्ये होणारे बदल, उन्हाचा तडाखा, अतिवृष्टी, कामगारांची कमतरता अशा प्रतिकूल स्थितीचा भातशेतीप्रमाणे ऊस शेतीलाही तडाखा बसत आहे. यावर्षी मे ते ऑक्टोबर अशा सुमारे सहा महिने पडलेल्या पावसामुळे ऊसाची अपेक्षित वाढ झाली नाही. फुटवे कुजण्याचे प्रमाण वाढले. यामुळे ऊसशेतीच्या उत्पादनावर परिणाम होणार आहे. कोकणातील लाल मातीत रूजवात होऊन घातलेल्या ऊसाचा गोडवा कमी होणार आहे...!