ब्रेकिंग - सिंधुदुर्गात आणखी आठ जणांना कोरोनाची लागण....

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 मे 2020

त्या महिलेचा मृत्यु कोरोनाचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिला बळी.. 

ओरोस (सिंधुदुर्ग) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणखी आठ रुग्ण आढळून आले आहेत. सकाळी सहा रुग्ण मिळाले होते. त्यामुळे आज दिवसभरात १४ रुग्ण आढळले आहेत. यातील एका महिलेचा पूर्वीच मृत्यु झाला होता. तो कोरोनाचा जिल्ह्यातील पहिला बळी ठरला आहे.

हेही वाचा- सिंधुदुर्गात त्या सहापैकी एका रूग्णाचा आधीच झाला होता मृत्यू...

यामुळे जिल्ह्यात एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या ३८ झाली असून यातील एकाचा मृत्यु झाला आहे. तर ७ रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. त्यामुळे आता एक्टिव्ह रुग्णांची संख्या ३० राहिली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: more Eight patient infected with corona in Sindhudurg