रक्त नसल्यानेच मातेने गमावले प्राण

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 ऑगस्ट 2018

कुडाळ - केवळ रक्त उपलब्ध नसल्यामुळे तेंडोली येथील सौ. वैदेही नारायण राऊळ (वय २१)यांना जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर प्राण गमवावे लागले. 

कुडाळ - केवळ रक्त उपलब्ध नसल्यामुळे तेंडोली येथील सौ. वैदेही नारायण राऊळ (वय २१)यांना जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर प्राण गमवावे लागले. 

सौ. वैदेही यांचे काल रात्री उपचारासाठी बांबुळी येथे नेत असताना बांद्याजवळ निधन झाले. त्यांनी ग्रामीण रुग्णालयात दोन जुळ्या मुलांना जन्म दिला. या प्रकरणी येथील रुग्णालयात औषध तुटवड्याबाबत स्वाभिमानच्या कार्यकत्यांनी येथील रुग्णालयात येत संताप व्यक्त केला. तालुक्‍यातील तेंडोली येथील सौ. वैदेही यांना काल प्रसूतीसाठी येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले होते. रात्री नऊ वाजता त्यांनी दोन जुळ्या मुलांना जन्म दिला, मात्र त्यांची तब्येत खालावत चालली होती. रक्ताची गरज होती, यासाठी सावंतवाडी इतर भागातून रक्ताच्या बॅगा मागविण्यात आल्या. ५ बॅगा मिळाल्या. त्याही कमी पडू लागल्या. याबाबत डॉक्‍टर पी. पी. वालावलकर यांनी संबंधित रुग्णाच्या कुटुंबीयांना सूचना दिल्या, मात्र उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला. नेमका मृत्यू कशामुळे झाला

याबाबत स्वाभिमान संघटनेचे पदाधिकारी यांनी डॉ. वालावकर यांची भेट घेतली. त्यावेळी ते म्हणाले, ‘‘आम्ही तिला वाचविण्यासाठी खूप शर्थीचे प्रयत्न केले. गेले दोन दिवस बारा जणांची प्रसूती झाली. राऊळ यांनी काल रात्री दोन मुलांना जन्म दिला. रक्तस्त्राव झाल्याने त्यांना रक्ताची फार गरज होती. रक्त नसल्यामुळेच त्या महिलेला मृत्यूला सामोरे जावे लागले.’’
या वेळी नगराध्यक्ष विनायक राणे, बांधकाम सभापती ओंकार तेली, संध्या तेरसे, साक्षी सावंत, रुपेश कानडे, राकेश कांदे, सुनील बांदेकर, बंड्या सावंत, अभय शिरसाट, रतन प्रभू, अश्विनी गावडे, एकनाथ गावडे व डॉक्‍टर कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

Web Title: Mother lost her life because of not having a blood